crime
crime sakal
जळगाव

जळगाव : आमदार चिमणराव पाटलांच्या पुतण्यावर हल्ला

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : रस्त्यांच्या ठेक्यांचे टेंडर टाकण्यावरून आमदार चिमणराव पाटील यांचा पुतण्या समीर पाटील याच्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात हल्ला करण्यात आला. फायटरधारी आठ ते दहा गुंडांनी कारवर हल्ला करून समोरील काच फोडली. या प्रकरणी माजी महापौर बंधू राहुल सोनवणे याच्यासह संशयितांविरुद्ध जिल्‍हापेठ पोलिसांत रात्री गुन्हा दाखल झाला आहे.

शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांचा पुतण्या समीर वसंतराव पाटिल यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे व्यवसायिक मित्र तथा गर्व्हमेंट कॅान्ट्रॅक्टर सचिन सनेर यांच्यातर्फे पारोळा तालुक्यातील रस्त्यांच्या ठेक्याबाबत टेंडर भरले होते. त्या सर्व कामांची निविदा गुरुवारी (ता. २१) उघडली जाणार होती. सचिन सनेर बाहेरगावी असल्याने त्यांच्या वतीने समीर पाटील टेंडर प्रक्रियेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात दुपारी एकला आले होते. जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोरील या कार्यालयात शिरताना प्रवेशद्वारावरच त्यांची कार (एमएच १९-बीयू ३३००) राहुल शांताराम सोनवणे आणि त्याच्या जवळपास आठ साथीदारांनी अडवून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली.

भ्रमणध्वनीवरून धमकी

राहुल सोनवणे याने सचिन सनेर यांना ८८३०५१८८४४ या क्रमांकावर शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याबाबतची रेकॉर्डींग पेालिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहे.

हल्ला चुकवून माघारी

समीर पाटील यांच्या कारवरच हल्ला चढविल्याने तत्काळ समीर यांनी चालकाला कार मागे घेण्यास सांगितले. हल्लेखोरांनी कारवर दगड मारून फेकल्याने समोरची काच फुटली. प्रसंगावधान राखत समीर पाटील चालकासह तेथून कार बाहेर काढून थेट जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. तेथून जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यावरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात राहुल शांताराम सोनवणे व त्याच्या साथीदारांवर दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unseasonal Rain: पुणे, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर इथं जोरदार पावसाला सुरुवात; 'या' जिल्ह्यात लवकरच कोसळणार

Sharad Pawar : "बालबुद्धीने बोलतात.." आमदारावर टीका करणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांनी फटकारले

Hardik Pandya: 'हार्दिकच्या नेतृत्वात अहंकार जाणवतो, तो धोनीसारखा...' एबी डिविलियर्सचं MI कॅप्टनबाबत खळबळजनक भाष्य

Latest Marathi News Live Update : खडकवासला परिसरात वादळ वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस

Mata Ling Bhairavi Temple : भारतातल्या या मंदिरात मासिक पाळीच्या काळातही महिलांना दिला जातो प्रवेश, केवळ महिलांनाच आहे पुजेचा मान!

SCROLL FOR NEXT