The facade of the fort and the temples in Triveni area. esakal
जळगाव

Chowgaon Fort : पर्यटकांचे आकर्षण ठरतोय चौगावचा किल्ला! सातपुड्याच्या पायथ्यावरील त्रिवेणी, हिरवागार डोंगरही खुणावतोय सर्वांना

Jalgaon News : सातपुड्याच्या पायथ्यावर असलेल्या चौगावपासून उत्तरेला तीन किलोमीटरवर त्रिवेणी (तिरोणी) आहे.

सकाळ वृत्तसेवा

गणपूर (ता. चोपडा) : चोपडा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्यावरील चौगावपासून उत्तरेला पहिल्या रांगेत असलेला किल्ला गवळी वाडा, त्रिवेणी परिसर व काही दिवसांत सुरू होणाऱ्या धबधब्यासह डोंगरकपरींचे आकर्षण आता पर्यटकांना खुणावू लागले आहे. त्यामुळे हळूहळू पर्यटक या भागाकडे वळू लागले आहेत. (Jalgaon Chowgaon Fort becoming attraction for tourists)

सातपुड्याच्या पायथ्यावर असलेल्या चौगावपासून उत्तरेला तीन किलोमीटरवर त्रिवेणी (तिरोणी) आहे. तीन नाल्यांचा संगम या ठिकाणी आहे. त्याचठिकाणी आता मंदिरे व पत्री शेड व बैठक व्यवस्था तयार करण्यात आली आहे. सुंदर असे हे जुने स्थळ भाविकांना आणि पर्यटकांना दरवर्षी आकर्षित करते.

या ठिकाणी पावसाळा सुरू झाल्यावर काही दिवसात सुरू होणारे ओहोळ, झरे व बंधारे पर्यटकांच्या नजरा खेचून घेतात. तेथून थोड्याच अंतरावर असलेला किल्ला, तत्कालीन गवळीवाडा गेल्या पाच- सात वर्षांत गडदुर्ग प्रेमींनी स्वच्छ व सुंदर केला आहे. त्या ठिकाणी आता सुंदर अशा सुविधा होऊ लागल्या आहेत.

शासकीय मदतीचा ओघही काही दिवसांत सुरू होणार असल्याचे सूतोवाच असून, हे पर्यटन क्षेत्र पुढील काळात पर्यटकांचे एक आकर्षण बनणार आहे. याच किल्ल्यावर गतकाळात सापडलेली एक तोफ सध्यास्थितीत चोपडा शहरातील जुन्या कचेरीजवळ ठेवली आहे. यानिमित्ताने या पुरातन वास्तूची ओळख जिल्हावासीयांना झाली आहे. (latest marathi news)

या किल्ल्यापासून जवळच्या दऱ्याखोऱ्यात झाडी अजूनही टिकून आहेत. पावसाळ्यात ही झाडी गर्द होते. गर्द व हिरवीगार दिसणारी ही पालवी, हिरवाई पर्यटक व निसर्गप्रेमींसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. राज्यात गडकिल्ल्यांचे आकर्षण असणारे असंख्य गडप्रेमी या ठिकाणी पावसाळ्यात पोहोचतात.

पावसाळ्यात डोंगर कपारीत डोंगरावर उतरलेले ढग, धुक्याचा आनंद घेत हा परिसर न्याहाळत असतात. साधारणपणे श्रावण महिन्यात या ठिकाणाहून जवळच असलेला धबधबा सुरू होतो आणि ते एक आकर्षण पर्यटकांना भुरड घालू लागते.

दुर्गप्रेमींच्या स्वच्छता मोहिमेने झळाळी

अशा या स्थळावर आता वनव्यवस्थापन समिती, गड दूर्ग संवर्धन समिती व किल्ल्यांच्या स्वच्छतेवर लक्ष देणारे किल्लाप्रेमी या ठिकाणी येऊन स्वच्छता व दुरुस्तीच्या कामाकडे लक्ष पुरवू लागल्याने या स्थळावर येणाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. या स्थळाबद्दलचे आकर्षण वाढत असल्याने तेथील सुविधांसाठी स्थानिकांसह तालुकावासीयांनी शासकीय मागणीची अपेक्षा केली आहे.

ती येत्या काही दिवसांत उपलब्ध होऊन त्यातून किल्ल्यापर्यंतचा रस्ता व किल्ल्यावरील सुविधा होऊ शकतील, अशी आशा आहे. दरम्यान, मधल्या काळात किल्ल्यावर मोठा ध्वज लावला आहे. ध्वज परिसरात सुविधाही निर्माण केल्या आहेत. कधीकाळी झाडाझुडप्यांनी वेढलेला किल्ला आता नजरेस पडू लागला आहे. दुर्गप्रेमींच्या स्वच्छता मोहिमेने त्याला झळाळी आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT