Collector Ayush Prasad esakal
जळगाव

Jalgaon News : जळगावमध्ये उद्यापासून महासांस्कृतिक महोत्सव : जिल्हाधिकारी प्रसाद

Jalgaon : जिल्हा प्रशासन आणि सांस्कृतिक विभागातर्फे २८ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्हा प्रशासन आणि सांस्कृतिक विभागातर्फे २८ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे महिला बचतगटांचा सरस महोत्सव देखिल होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील कलावंतानांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. (Mahasanskrit Mahotsav in Jalgaon)

२८ फेब्रुवारीस महाराष्ट्राची हास्यजत्रा, २९ रोजी डॉ. सलिल कुलकर्णी दिग्दर्शित आयुष्यावर बोलू काही, १ मार्चला सन्मीता धापटे-शिंदे, चैतन्य कुलकर्णी प्रस्तुत ‘सुरसंस्कृती’, २ मार्चला महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारा ‘गर्जा सुवर्ण महाराष्ट्र’ हा कार्यक्रम सादर होणार आहे.

३ मार्च रोजी मुंबई साहित्य संघ निर्मित व उपेंद्र दाते दिग्दर्शित ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

तसेच या कालावधीत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे महिला बचतगटांचा विभागीय सरस महोत्सव देखिल होणार आहे. या महोत्सवात २५० स्टॉल सहभागी राहणार असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले.

यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, ग्रामीण विकास यंत्रणेचे हरीश भोई, यावल वनविभागाचे जमील शेख, अमित माळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT