forest department esakal
जळगाव

Jalgaon News : सुरक्षारक्षक परवाना नसातना वनविभागाचे एजन्सीला कंत्राट

Jalgaon : सुरक्षारक्षक कपुरवित असलेल्या शिवा सर्विसेसकडे शासनाचा कोणताही अधिकृत परवाना नसताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संगमनत साधून सुरक्षारक्षक पुरवण्याचा कंत्राट मिळविला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव वनविभागाच्या लांडोरखोरी वनोद्यानात २०१७ पासून सुरक्षारक्षक कपुरवित असलेल्या शिवा सर्विसेसकडे शासनाचा कोणताही अधिकृत परवाना नसताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संगमनत साधून सुरक्षारक्षक पुरवण्याचा कंत्राट मिळविला आहे अशी तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. (Jalgaon Contract to forest department agency without security guard licence)

तक्रारीत म्हटले आहे, की वनविभागाचा हा भोंगळ, भ्रष्ट कारभार एवढ्यावरच थांबला नसून शिवा सर्विसेसला २०१७ मध्ये खासगी सुरक्षारक्षक पुरविण्यकामी दिलेला ठेका हा कोणतीही निविदा प्रकाशित प्रसिद्ध न करता याच शिवा सर्विसेला वारंवार नियमबाह्य पद्धतीने तीन-तीन वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात येत आहे.

सुरक्षारक्षक परवाना नसल्याने सदर ठेकेदार सुरक्षा रक्षकाच्या अनुषंगाने शासनाकडे जमा करावा लागणारा जीएसटी, व्यवसाय कर बुडवित आहे.

ठेकेदार व वन विभागाच्या संगनमताने शासनाच्या जीएसटी तसेच व्यवसायकर विभागाची फसवणूक केली जात आहे.

शिवा सर्विसेसच्या ठेकेदाराकडून संबंधित सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांना वेतन, ईपीएफ, ईएसआय देताना किमान वेतन कायद्याला तिलांजली दिली जात आहे. त्यामुळे आजतागायत संबंधित ठेकेदाराने शासनाचा बुडवलेला जीएसटी व व्यवसाय कर दंडासह वसूल करण्यात यावा. सुरक्षा रक्षकांना किमान वेतन कायद्यानुसार मागील थकीत ईपीएफ, ईएसआय व्याजासह देण्यात यावी अशी मागणी डॉ. सोनवणे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT