A tense silence in Jamnera. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : पोलिस ठाण्यावरील हल्ला प्रकरणी 10 जणांना अटक; जामनेरला तणावपूर्ण शांतता

Jalgaon Crime : दगडफेकीसह पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात सुमारे तीनशे ते चारशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : येथील पोलिस ठाण्यावर दगडफेकीसह पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात सुमारे तीनशे ते चारशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात दहा संशयितांना अटक करण्यात आली असून, तीन जण फरार आहेत. या घटनेत दहा पोलिस जखमी झाले आहेत. दरम्यान, या गुन्ह्यात पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले असून, त्या आधारे पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत. (10 people arrested in case of attack on police station in Jamner)

जामनेर तालुक्यात सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करून शेतात फेकून देण्यात आले होते. या प्रकरणी संशयित सुभाष उमाजी भिल याला गुरुवारी (ता. २०) भुसावळमधून अटक करण्यात आली. त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीला आमच्या ताब्यात द्या, असे म्हणत गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास जमाव मोठ्या संख्येने शहरात जमला होता. या जमावाने टायर जाळणे, दुचाकींना आगी लावून पेटविणे असे प्रकार सुरू केले होते.

..अशी घडली घटना

पोलिस निरीक्षक किरण शिंदे, निरीक्षक सानप यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. संतप्त जमावाने थेट पोलिस ठाण्यावर तुफान दगडफेक सुरू केली. पोलिसांनी बचावासाठी लाठ्या-काठ्यांचा मारा केला असता संतप्त जमावानेही दंडुके घेऊन पोलिसांवर हल्ला चढवला. दहा-पंधरा पोलिस कर्मचारी दीड ते दोन हजाराच्या जमावाला पांगविण्यास असमर्थ ठरले. जमावाने केलेल्या हल्ल्यात पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह पोलिस कर्मचारी संजय खंडारे, राजू माळी, सुनील राठोड, रमेश कुमावत, प्रीतम बरकले, नीलेश महाजन जखमी झाले.

जामनेरात तणावपूर्ण शांतता

जळगाव येथून दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर- पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. सध्या जामनेर शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

संशयितांना २५ जूनपर्यंत कोठडी

या प्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित प्रमोद सुरवाडे (जामनेर पुरा), प्रदीप कोळी (सामरोद), मंगल ठाकरे (हिवरखेडा), पंकज ठाकरे, रितेश मोरे, दीपक पवार (चिंचोली), अमोल सोनवणे, आकाश पवार (ओझर), युवराज पवार (इंदिरा आवास, जामनेर), आकाश पवार (इंदिरा आवास, जामनेर) यांना अटक करण्यात आली आहे.

शालू सिंग शेवाळे (रा. गिरजा कॉलनी, जामनेर), अशोक भिल (खडकी), श्रीराम भिल (जामनेर) हे तिघे संशयित फरार आहेत. दरम्यान, अटकेतील संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश पी. एन. चांमले यांनी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील कृतिका भट यांनी बाजू मांडली.

या व्यतिरिक्त सुमारे तीनशे ते चारशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर पवार यांचे मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलिस निरीक्षक बबन आव्हाड हे करीत आहे. दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांच्या नेतृत्वात जामनेर शहरातून रूट मार्च काढण्यात आला.

''जामनेर येथे तणावपूर्ण शांतता असून, इतर संशयितांचा शोध पोलिस घेत आहे. नागरिकांनी कुठलीही भीती न बाळगता व अफवांवर विश्वास न ठेवता आपले व्यवहार सुरळीत करावे.''- डॉ.महेश्वर रेड्डी, पोलिस अधीक्षक, जळगाव जिल्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांवर काही ठिकाणी वाहतूक मंदावली, नागरिकांची तारांबळ

हॅप्पी दिवाळी! दिपिका-रणवीरने लेक 'दुआ'सोबत पहिल्यांदाच शेअर केला फोटो....

शेवटच्या ओव्हरमध्ये ४ धावा अन् सामना टाय... BAN vs WI सामन्यात ड्रामा; थरारक सुपर ओव्हरमध्ये लागला निकाल

Deglur ZP Elections : ग्रामीण भागात मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची धामधूम; शेतकऱ्यांच्या प्रश्नांना बगल

PESA Candidates Disqualification : पेसा भरतीतील २३ उमेदवारांचे भवितव्य धोक्यात; दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कागदपत्रांची पूर्तता कशी करणार?

SCROLL FOR NEXT