beating esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अमळनेरला मुलांच्या भांडणात 2 परस्परविरोधी गुन्हे दाखल

Jalgaon Crime : येथील मुंदडानगरातील मुलांच्या भांडणात दोन कुटुंबांत हाणामारी होऊन दोन महिलांचा विनयभंग झाल्याची घटना बुधवारी (ता.२६) सायंकाळी सातला घडली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : येथील मुंदडानगरातील मुलांच्या भांडणात दोन कुटुंबांत हाणामारी होऊन दोन महिलांचा विनयभंग झाल्याची घटना बुधवारी (ता.२६) सायंकाळी सातला घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारींवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंदडानगर एकमधील किशोर पाटील (पूर्ण नाव माहीत नाही) हा मुलांच्या भांडणावरून एका मुलाला मारीत होता. (2 conflicting cases filed in Amalner in children fight )

मुलाचे वडील त्याला विचारायला गेले असता, त्याने मुलाच्या आईला अश्लील शिवीगाळ करून तिचा पंजाबी ड्रेस फाडून विनयभंग केला. शिवाय पती आवरायला गेला असता, त्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. महिलेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस ठाण्यात किशोर पाटीलविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करणयात आला आहे. याबाबतचा तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.

दुसऱ्या गटातर्फे महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार बुधवारी (ता.२६) संध्याकाळी सात वाजता गल्लीत भांडण सुरू असताना त्याठिकाणी बोलायला गेली. प्रभाकर भाईदास पवार व भाग्यश्री प्रभाकर पवार त्या ठिकाणी आले व त्यांना गैरसमज होऊन त्यांनी त्यांच्या मुलीला बोलते, असा गैरसमज करून मारहाण सुरू केली.

प्रभाकर याने विनयभंग केला व नंतर पती किशोर पाटील यांच्या डोक्यात काठी टाकून दुखापत केली. म्हणून दोन्ही पतीपत्नींविरुद्ध विनयभंग, मारहाण, अश्लील शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेत १० वर्षात किती गोळीबाराच्या घटना घडल्या? प्रश्नावर उत्तर देताच थेट गळ्यावर झाडली गोळी; चार्ली किर्क यांची हत्या

Nepal Protest : नेपाळमधील विमानसेवा पुन्हा सुरू, एयर इंडियाची पहिली फ्लाईट दिल्लीसाठी रवाना

Mehbooba Mufti: मेहराज मलिक यांना सोडा : मेहबूबा मुफ्ती; लक्ष विचलित करण्यासाठीच अटक केल्याचा आरोप

Oats Beetroot Dosa Recipe: ओट्स अन् बीटचा डोसा खाल्लाय? सकाळी नाश्त्यात झटपट होणारी रेसिपी जाणून घ्या

माेठी बातमी! 'राज्य शासनाकडून सोलापूर जिल्ह्यातील ५८ गावे पुन्हा वाऱ्यावर'; हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदी, प्रशिक्षण फक्त मराठवाड्यातील ग्राम समितीलाच

SCROLL FOR NEXT