arrested  esakal
जळगाव

Jalgaon Crime : आईल मिलवर दरोडा प्रकरणी 2 संशयितांना अटक! 10 महिने सलग शोध घेत पेालिसांनी ठोकल्या बेड्या

Crime News : पाचोऱ्याचे पोलिस कर्मचारी राहुल शिंपी, योगेश पाटील यांनी सीसीटीव्हीसह इतर तांत्रिक माहिती संकलीत करून दरोडा टाकणाऱ्या टोळीत पाचोऱ्यातील तिघांचा समावेश असल्याचा संशय बळावला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime : पाचोरा तालुक्यातील मोंढाळा रोडवरील ऑइल मिलमध्ये सुरक्षारक्षकाला पिस्तूल लावून दरोडा टाकणाऱ्या टोळीतील दोघांना तब्बल दहा महिन्यानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले. संशयितांकडून दरोड्यातील ऐवजही जप्त केला आहे. (Jalgaon Crime 2 suspects arrested in oil mill robbery case)

मोंढाळे रस्त्यावर आशिष जगदीश बजोरीया (वय ४८) यांची हिंद ऑईल मिल आहे. दहा महिन्यांपूर्वी २३ जुलै २०२३ ला रात्री साडेतीनच्या सुमारास मोंढाळा रोडवरील ऑईल मिलमध्ये सुरक्षारक्षक प्रभाकर रामदास पाटील (वय ६१, रा. सारोळा, ता. पाचोरा) यांना एकाने चाकूचा धाक दाखविला, तर दुसऱ्याने हातातील पिस्तूल लावून हातपाय बांधले व आईल मिलमधून ४ लाख ५ हजारांची रोकड, पाच हजारांची तिजोरी, डीव्हीआर मशीन, मोबाईल चोरून नेला होता. याबाबत पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.

सीसीटीव्ही फुटेज अन्‌ बेड्या

पाचोऱ्याचे पोलिस कर्मचारी राहुल शिंपी, योगेश पाटील यांनी सीसीटीव्हीसह इतर तांत्रिक माहिती संकलीत करून दरोडा टाकणाऱ्या टोळीत पाचोऱ्यातील तिघांचा समावेश असल्याचा संशय बळावला. (latest marathi news)

पथकाने पाचोरा येथून संशयित अल्ताफ मसूद खान (वय ३१,रा. नुरानीनगर, जारगाव, ता. पाचोरा) व सरफराज हसन शहा फकीर (वय २२, रा. मुल्लावाडा, पाचोरा) यांना दोघांना ताब्यात घेतले व पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. संशयित मुक्तार ऊर्फ धड्या मेहबूब शेख (रा. नूरानीनगर, जारगाव) फरारी असून, त्याचा शोध सुरू आहे.

दहा महिन्यांचे परिश्रम

पोलिस कर्मचारी राहुल शिंदे, योगेश पाटील यांनी सलग दहा महिने तपास करून दोघी संशयितांना अटक केली व त्यांच्याकडून चोरीचा ऐवज व गुन्ह्यात वापरलेली नकली पिस्तूल जप्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

योग गुरूचा १७ वर्षीय मुलीसह ८ महिलांवर अत्याचार, अल्पवयीन पीडितेनं दिलेल्या तक्रारीनंतर सगळा प्रकार उघडकीस

Maharashtra Health Alert: राज्यात असंसर्गजन्य आजारांचा धोका; मधुमेह, दमा, स्थूलतेच्या प्रमाणात वाढ

Big Revelation in Tharla Tar Mag: ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट! सायलीच खरी तन्वी! अर्जुनला सत्यासाठी पोहचला थेट बायकोच्या शाळेत

Girish Mahajan : ठाकरे ब्रॅन्ड नामशेष झाला, आगामी निवडणुकीत बॅन्ड वाजणार; गिरीश महाजन यांची घणाघाती टीका

Pimpri News : नागरी सुविधा केंद्राला मुदतवाढ, नव्या निविदा प्रक्रियेपर्यंत अप्पर तहसीलमध्ये सेवांचा पुरवठा सुरूच

SCROLL FOR NEXT