Abduction Crime esakal
जळगाव

Jalgaon Crime: 3 तरुणांचे अपहरण करून 25 लाखांची मागणी! 8 लाखांत तडजोड; पोलिसांची तीन पथके छत्तीसगडच्या दिशेने रवाना

Crime News : रविवारी (ता. २) पहाटे पाचच्या सुमारास फिर्यादी सागर लुल्ला यांच्या मोबाईलवर मित्र विशाल शुबवाणी यांचा फोन आला अन...

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime : शहरातील एका व्यापाऱ्याच्या शालकासह तीन तरुणांचे साई सिटी (कुसुंबा) येथून रविवारी (ता.२) अपहरण करण्यात आले. तिन्ही तरुणांची सुटका करण्यासाठी सुरवातीला २५ लाखांची मागणी होऊन तडजोडीअंती ८ लाखांची खंडणी मागण्यात आली. यापैकी १ लाख ९० हजार रुपये संशयितांना दिले असून, एमआयडीसी पोलिसांसह तीन पथकांना पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी छत्तीसगड येथे रवाना केले आहे. (Jalgaon Crime 3 youths kidnapped demanded 25 lakhs)

सागर कमल लुल्ला (वय २४, रा. नवजीवन सोसायटी, भुसावळ) शेअर बाजारासह मार्केटिंगचा व्यवसाय करतात. जळगाव शहरातील सिंधी कॉलनीत त्यांचे दुकान असून, भुसावळ येथून ते अपडाऊन करतात. त्यांच्या पत्नीचा आत्येभाऊ रोहित कैलास दर्डा (रा. टीव्ही टॉवर, भुसावळ) व त्याचा मित्र विशाल अनिल शुबवाणी (रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) असे दोघेही काही दिवसांपासून कुसुंबा येथील अजय ठाकरे (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) याच्याकडे ऑनलाइन गेम खेळण्यासाठी येत होते. रविवारी (ता. २) पहाटे पाचच्या सुमारास फिर्यादी सागर लुल्ला यांच्या मोबाईलवर मित्र विशाल शुबवाणी यांचा फोन आला.

‘आमचे अपहरण झालेय’

विशालने सांगितले, की आम्ही फसलो आहोत. आम्हाला घेण्यासाठी रात्री एकला सहा गुंड आले. त्यांना २५ लाख रुपये दिले नाही, तर ते आम्हाला लखनऊ घेऊन जात आहेत. तुम्ही २५ लाख रुपये द्या, त्यावेळी लुल्ला यांनी आपल्याकडे एवढे पैसे नसल्याचे सांगतच फोन बंद केला. मात्र, पुन्हा त्यांच्या मोबाईलवर सकाळी साडेसहाच्या सुमारास दुसरा फोन आला. पलीकडून अज्ञात व्यक्तीने धमकावत, ‘तुमको अगर तुम्हारे लडके जिंदा चाहिये तो जल्दी से जल्दी पैसे दो’, असे सांगून त्याने फोन विशाल शुबवाणी याच्याकडे दिला.

आठ लाखांत तडजोड

विशालने या गुंडासह खंडणीच्या रकमेबाबत बोलणे होऊन तडजोडीअंती ८ लाख रुपयांमध्ये आम्हाला सोडण्याचे कबूल केले आहे. ८ लाख रुपये पाठवून दे’, असे सांगितले. फिर्यादीने मात्र त्यांच्याकडे अडीच लाख रुपये असल्याबाबत असमर्थता दर्शविली. नंतर दहाला फिर्यादी सागर लुल्ला त्यांच्या दुकानावर गेले. दुकानावर हरीश शिरवाणी आले व त्यांनी सांगितले, की त्यांच्या कंपनीत काम करणारा पवन महाजन याच्या मोबाईलवर अजय ठाकरे यांचा फोन आला होता.

तिघांना मारून टाकू

त्या फोनवरून कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने ‘लवकर पैसे द्या नाही, तर आम्ही रोहित दर्डा, विशाल शुबवाणी, अजय ठाकरे यांना मारून टाकू’, असे सांगण्यात आले. फोनवर तो बोलत असताना, अजय, रोहित आणि विशाल यांचे मोठमोठ्याने ओरडण्याचे आवाज येत होते.

१ लाख ९० हजार दिले

नंतर परत सायंकाळी पवन याला फोन आला. पलीकडून बोलणाऱ्या अज्ञात व्यक्तीने ‘तुम्हाला सकाळपासून समजावतोय. तुम्हाला समजून येत नाहीये’, असे बोलून त्याने अजय ठाकरे याचा रडण्याचा आवाज ऐकवला. यानंतर पलीकडले अज्ञात व्यक्तीने अजय ठाकरे याचा आयसीआय बँकेचा खाते क्रमांक पाठविला.

त्यानंतर फिर्यादी सागर लुल्ला यांनी अजय ठाकरे यांच्या अकाउंटवर पवनच्या खात्यावरून १ लाख २० हजार रुपये पैसे पाठविले. दुसरीकडे पैसे मागणीबाबत रोहित दर्डा याची बहीण पूजा दर्डा तिने सांगितले, की रोहितला कोणीतरी किडनॅप केले आहे. त्याला सोडवण्यासाठी पैशांची मागणी केली आहे. त्यानुसार ७० हजार रुपये फिर्यादीने संशयितांच्या खात्यावर टाकले.

शोधार्थ पथके रवाना

याबाबत सागर लुल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यावरून एमआयडीसी पोलिसांसह गुन्ह शाखेची पथके छत्तीसगडच्या दिशेने रवाना झाली आहेत.

रात्री उशिरा अटकेची शक्यता

तीन तरुणांचे अपहरण करणाऱ्या आठही संशयितांचा नेमका ठावठिकाणा पोलिसांना गवसला असून, संशयितांची तांत्रिक माहिती काढून त्यांना रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Lalit Modi and Vijay Mallya : Video-ललित मोदी अन् विजय मल्ल्याचा लंडनमधील पार्टीतील मजा-मस्ती व्हिडिओ तुम्ही पाहिली का?

Libra Soulmate Match: तुळ राशीची 'सोलमेट' कोण? जाणून घ्या राशीगणनेनुसार

SCROLL FOR NEXT