Crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime news : मेहुणबारे परिसरात 3 हातभट्टींवर कारवाई; एक लाख 15 हजारांचा ऐवज जप्त

Jalgaon Crime : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मेहुणबारे पोलिसांनी केलेल्या कारवाईत पोहरे आणि खेडी भागात दोन हॉटेलांवर छापा टाकून देशी व विदेशी दारू विक्रीचा प्रकार उघडकीस आणला. (Jalgaon Crime Action taken on 3 and furnaces in Mehunbare area)

तर सायगाव येथे दोन व रहिपुरी येथे एक, अशा तीन हातभट्ट्या उद्धवस्त केल्या. या कारवाईत पोलिसांनी सुमारे एक लाख १५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. खेडी ते दस्केबर्डी हॉटेल जय मल्हारमध्ये देशी व विदेशी दारूची विक्री सुरू होती. सोमवारी (ता. २२) रात्री नऊला पोलिसांनी छापा टाकून दोन हजार २८० रुपयांच्या १८ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या.

याप्रकरणी किशोर रावते याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, तर दुसरी कारवाई खेडगाव-पोहरे रस्त्यावरील हॉटेल राजेश्वरीवर करण्यात आली. राकेश माळी बेकायदा देशी व विदेशी दारू विक्री करताना मिळून आला. त्याच्याकडून दोन हजार ४३० रुपयांच्या २० दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

रहिपुरीत रेल्वे पुलाखालीच हातभट्टी

हॉटेलांमध्ये देशी व विदेशी दारूची बेकायदा विक्री सुरू असताना, अवैध हातभट्ट्यांनाही उत आला आहे. एकाच दिवसात पोलिसांनी तीन ठिकाणी हातभट्ट्यांवर छापे टाकले. त्यात रहिपुरी येथे चक्क रेल्वे पुलाखाली गिरणा नदीकाठावर हातभट्टी आढळून आली.

भावडू नाईक याची ही हातभट्टी होती. तेथून पोलिसांनी १२ हजार २०० रुपयांचे दारू तयार करण्याचे कच्चे व पक्के रसायन जप्त करून ते जागीच नष्ट केले. सायगाव (ता. चाळीसगाव) शिवारात केटी वेअर नाल्याच्या झुडपातच हातभट्ट्या पोलिसांना आढळून आल्या. त्यात समाधान पवार याच्या हातभट्टीवरून ३९ हजार ४०० रुपयांचे कच्चे व पक्के रसायन.

तर अशोक सोनवणे याच्या हातभट्टीवरून ५८ हजार ७०० रुपयांचे कच्चे व पक्के रसायन, दारू जप्त करून ते जागीच नष्ट केले. दोन हॉटेलांमध्ये देशी व विदेशी दारू विक्री, तर तीन ठिकाणी हातभट्टीची दारू जप्त, असा सुमारे एक लाख १५ हजार १० रुपयांची दारू व रसायन पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी पाचही गुन्ह्यांत संशयितांविरोधात मेहुणबारे पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT