Crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : उपकार्यकारी अभियंत्याकडून मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

Jalgaon Crime : उप कार्यकारी अभियंता तथा सुरक्षितता अधिकारी मोहन यशवंत सरदार यांच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीसोबत अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात ‘पोस्को’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : तालुक्यातील दीपनगर औष्णिक वीज केंद्रातील उप कार्यकारी अभियंता तथा सुरक्षितता अधिकारी मोहन यशवंत सरदार यांच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीसोबत अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात ‘पोस्को’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon Crime Attempt to molest girl by Deputy Executive Engineer)

या प्रकरणी पीडित मुलीचा संशयित मोहन यशवंत सरदार याने ७ एप्रिलला सायंकाळी साडेसातच्या दरम्यान पाठलाग करून लिफ्टमध्ये एकटी असल्याचा फायदा घेत ‘तू मला खूप आवडते, खूप छान दिसते, असे बोलून लज्जास्पद कृत्य केले. पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रयत्नासंदर्भात कार्यकारी संचालक (मांस) मुंबई, मुख्य अभियंता (तांत्रिक) माटुंगा, मुख्य अभियंता (सवसु) दीपनगर, मुख्य महाव्यवस्थापक (मांस) मुंबई, (प्रशासन) दीपनगर, उप महाव्यवस्थापक (मांस -१) महानिर्मिती माटुंगा.

मुंबई यांना ई- मेलद्वारे पत्रव्यवहार केल्याने सदरील कार्यालयामार्फत मोहन सरदार याच्याविरोधात गंभीर स्वरूपाचा अपराध केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित. (latest marathi news)

कर्मचारी वर्तणूक शिस्त व गैरकृत्य या सदरात मोडत असून त्याबद्दल शिस्तभंग कारवाईची करण्यात आली असून, १९ एप्रिलला दुपारनंतर महानिर्मिती कंपनीच्या सेवेतून तत्काळ निलंबित करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत. निलंबन कालावधीत दर सोमवारी वरिष्ठ व्यवस्थापक (सुरक्षा) महानिर्मिती, महाऔष्णिक विद्युत केंद्र, चंद्रपूर यांच्या कार्यालयात हजेरी लावावी.

निलंबन कालावधीत कोणत्याही प्रकारची रजा मिळण्यास पात्र राहणार नाही. तसेच मुख्य अभियंता, महाऔष्णिक विद्युत केंद्र, चंद्रपूर यांच्या पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशही दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मुंबईत ऐन दिवाळीत दुर्घटना, चाळीत आग लागून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघे जखमी

Nagpur Fraud: नागपूर शहरात घट्ट होतोय ‘डिजिटल अरेस्ट’चा विळखा; सेवानिवृत्त अधिकारी टार्गेट; ७५ लाखांपेक्षा अधिकची फसवणूक

Latest Marathi News Live Update : मधुराईत कागद आणि भंगार धातू साठवणाऱ्या गोदामाला आग, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव

उपोषणस्थळी भेटायला वेळ नाही, उपोषणकर्त्याला घरी बोलावून पाजला ज्यूस, शिंदेंच्या मंत्र्यांची असंवेदनशीलता

शाहिद आफ्रिदीने 'लायकी' दाखवली! अफगाणिस्तानला उपकाराची आठवण करून दिली ; म्हणतो, आम्ही तुम्हाला पोसतोय...

SCROLL FOR NEXT