Police officer with suspect with MD of 72 lakhs esakal
जळगाव

Jalgaon MD Drugs Crime : भुसावळला 72 लाखाच्या एमडीसह तिघे अटकेत; विक्रीला आलेल्या डिलरसह मुंबईचा म्होरक्या गजाआड

Crime News : यात पोलिसांनी आज पुरवठा करणारा मुंबईच्या म्होरक्याला अटक केली आहे

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : भुसावळ भागात बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल मध्ये ‘मेथाक्वालोन’ (एमडी) ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एकासह खरेदी करणारा अशा दोघांना पोलिसांनी मंगळवारी (ता.१९) रात्री अटक करून तब्बल ७३ लाखा ८० हजारांचे एम.डी. (मेथाक्वालोन) डग्ज्‌ जप्त केले. यात पोलिसांनी आज पुरवठा करणारा मुंबईच्या म्होरक्याला अटक केली आहे. (Jalgaon Crime Bhusawal 72 Lakh MD along with three arrested Mumbai leading gajaad with dealer for sale marathi news)

जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात २७ गावठी पिस्तूल पोलिसांनी जप्त केल्या असून अमली पदार्थाच्या कारवाईवर देखील लक्ष केंद्रित केले आहे. आज आणखी एक मोठी कारवाई करण्यात पोलिसांना यश आले. पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले.

भुसावळ उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पोलिसांच्या पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर असलेल्या हॉटेल मधुबन जवळून ट्रॅप लावून कुणाल भरत तिवारी (तापी नगर, भुसावळ), जोसेफ जॉन वाडाल्यारेस (कंटेनर यार्ड भुसावळ) या दोघांना ताब्यात घेतले. दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडून ९१० ग्रॅम एम.डी. बाजारभावानुसार ७२ लाख ८० हजार इतकी असून यात दोघांना अटक केली.

तिसऱ्याला मुंबईतून अटक

तिसरा संशयित आरोपी दिपेश मुकेश मालवीय (रा. शेर ए पंजाब हॉटेल, वरणगाव रोड भुसावळ) याने विक्रीसाठी पुरवली आहेत असे तपासात निष्पन्न झाले आहे. शिवाय हे ड्रग्ज मुंबईतून आणण्यात आल्याचे समोर आल्यानंतर बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या पथकाने मुंबईतून एकाला ताब्यात घेतले आहे. तिन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २ दिवस पोलिस कोठडीत रवाना केले आहे. उपनिरीक्षक मंगेश जाधव, योगेश महाजन तपास करीत आहे.

पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी व अप्पर अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनात श्री पिंगळे, निरीक्षक गजानन पडघन, उपनिरीक्षक मंगेश जाधव यांच्यासह विजय नेरकर, नीलेश चौधरी, रमण सुरळकर,यासीन पिंजारी, प्रशांत सोनार, सचिन चौधरी, योगेश महाजन, परदेशी, जावेद शाह,राहुल वानखेडे, भुषण चौधरी, आढाळे अशांच्या पथकाचा या कारवाईत समावेश होता. स्वतंत्र पथकामार्फत इतर संशयित आरोपीचा शोध सुरु असुन जळगाव ते मुंबई कनेक्शन सह जिल्‍ह्यात इतरत्र कुठे पुरवठा होते यांचाही शोध घेतला जात असल्याचे डॉ.रेड्डी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT