crime esakal
जळगाव

Jalgaon News : मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने बनावट दाखला; बोदवड पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा

Jalgaon News : बोदवड नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने बनावट ना हरकत दाखला बनविल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : बोदवड नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने बनावट ना हरकत दाखला बनविल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. नंदलाल शामराव पठ्ठे (बोदवड) असे संशयिताचे नाव आहे. नगरपंचायतीतर्फे लिपिक विजय नंदलाल अग्रवाल (वय ५१) यांच्या फिर्यादीवरून संशयित नंदलाल शामराव पठ्ठे रा.बस स्टॅन्ड जवळ बोदवड यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. (jalgaon case registered against one for making fake no-objection certificate)

पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, संशयिताने २०१७ मध्ये बोदवड नगरपंचायतीचे बनावट गोल रबरी स्टॅम्प बनवून नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने ना हरकत दाखला मिळण्यासाठी बनावट अर्जावर नगरपंचायत बोदवडचे बनावट गोल रबरी स्टॅम्प मारून तसेच नगरपंचायत कार्यालय बोदवड चा बनावट जावक क्रमांक असलेला बनावट ना हरकत दाखला तयार करून सदर दाखल्यावर मुख्याधिकारी नगरपंचायत बोदवड यांची बनावट सही करून बनावट दाखला तयार केल्याचा आरोप आहे.

लबाडीच्या हेतूने तयार केलेल्या दाखल्याद्वारे भुसावळ उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे वृत्तपत्राच्या नोंदणीसाठी प्रस्ताव जमा केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मंगळवारी (ता.१३) रात्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी चौकशी सुरु असल्याने चौकशीनंतर विलंबाने हा गुन्हा दाखल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmers Protest: कोकणातील शेतकरी मुंबईत आक्रमक! बडे नेते आणि आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु; काय आहे मागणी?

Election Fraud: मतदानानंतर उघड झाला मोठा खेळ! ‘या’ राज्याच्या निवडणुकीत अवैध मतदान; १० विदेशी नागरिकांसह चार महिला अटकेत

High Court : ती मशीद नाही तर देवी सरस्वतीला समर्पित मंदिर ; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निकाल

हार्दिक श्रेयस विसरा! रवी शास्त्रींनी टीम इंडियाच्या कॅप्टन्सीसाठी सुचवलं 'हे' नाव म्हणाला मला...

Suvendu Adhikari: बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राजीनामा दिला; कोणती जागा सोडली? राजीनाम्यानंतर भावूक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT