Jalgaon Crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : मुलीवर अत्याचार करणाऱ्यास दुहेरी शिक्षा; अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

Jalgaon News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील आरोपीस अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने दुहेरी २० वर्षांची शिक्षा व ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : मित्राच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील आरोपीस अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने दुहेरी २० वर्षांची शिक्षा व ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

चुंचाळे येथील पीडितेच्या वडिलांचा मित्र ज्ञानेश्वर रामदास कोळी (वय ४५) हा २०२० मध्ये साधारणत: मार्च महिन्यात तिचे आई, वडील घरी नसताना घरी येऊन पाणी मागण्याच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलगी प्रतिकार करीत असताना ही बाब जर कोणाला सांगितली तर तुला पाहून घेईल, अशी धमकी दिली.

पुन्हा चार दिवसांनी मुलीचे आई, वडील व भाऊ शेतात गेले असताना ज्ञानेश्वर घरी आला. मुलगी टीव्ही पाहत असताना त्याने दरवाजा बंद करून पुन्हा अत्याचार केले. तीन, चार महिन्यांनी मुलीचे पोट दुखू लागल्याने मुलीच्या आईने तिला डॉ. दीपक चौधरी यांच्याकडे नेले असता डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगितले.

तेव्हा घडलेला प्रकार उघडकीस आला. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपी ज्ञानेश्वर विरुद्ध भादंवि ३७६ (१)(अ), ३७६ (३), ५०६, बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा २०१२ च्या कलम ३ (अ) (४), ५ (ज)(२) ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयात न्या. पी. आर. चौधरी यांच्यासमोर चालला. सरकारी वकील ॲड. किशोर बागूल यांनी ११ साक्षीदार तपासले. (latest marathi news)

वैद्यकीय अधिकारी चोपडा, जळगाव व तपासणी अधिकारी संदीप आराख यांची साक्ष तसेच नाशिक येथील प्रयोगशाळा डीएनए अहवाल ग्राह्य धरून न्या. पी. आर. चौधरी यांनी आरोपी ज्ञानेश्वर कोळी याला कलम ३ (अ) ४ प्रमाणे २० वर्षांची शिक्षा, तसेच कलम ५ (ज) २, ६ प्रमाणे २० वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

दंडाची रक्कम पीडित मुलीच्या उदरनिर्वाहासाठी देण्याचे आदेश दिले. तसेच तिला झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल तिला निर्भया फंडातून मदत मिळण्याची तजबीज ठेवली आहे. सरकारी वकील ॲड. किशोर बागुल यांना त्या आदेशाची प्रत देऊन जिल्हा विधी सेवा समितीकडे पीडितेला फंड मागणी करण्याबाबत सूचित करावे, असेही आदेशात म्हटले आहे.

आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून अटकेत होता. तपासणी अधिकारी संदीप आराख, पैरवी अधिकारी सहाय्यक उपनिरीक्षक उदयसिंग साळुंखे, पोलिस कर्मचारी हिरालाल पाटील, नितीन कापडणे यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खान सर प्रकरणातील आरोपीचा नेपाळमध्ये संशयास्पद मृत्यू, अटकेच्या भीतीनं गेलेला पळून

तुरुंग निरीक्षकाचा घरात आढळला मृतदेह, पत्नीचे महासंचालकांवर गंभीर आरोप; पोलिसात दाखल केली तक्रार

Latest Live Updates Marathi: आजही सरकारला वंचित बहुजन आघाडीची धास्ती भरते - सुजात आंबेडकर वंचित नेते

World Blood Donor Day 2026: शाकाहारी लोक रक्तदान करू शकत नाहीत? रक्तदानाबद्दलचे 'हे' Myths आणि Facts जाणून घ्याच

छोट्या पडद्यावर परतणार शिव आणि गौरीची हिट जोडी; प्रोमो पाहून प्रेक्षक खुश; 'या' मालिकेत दिसणार

SCROLL FOR NEXT