Gambling Crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : उटखेड्यात जुगारअड्ड्यावर छापा; 9 संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल

Crime News : छापा टाकून सुमारे साडेपंधरा हजार रुपयांसह सात मोबाईल व सात दुचाकी असा सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज रावेर पोलिसांनी जप्त केला.

सकाळ वृत्तसेवा

रावेर : उटखेडा (ता. रावेर) येथे झन्नामन्ना जुगाराच्या अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून सुमारे साडेपंधरा हजार रुपयांसह सात मोबाईल व सात दुचाकी असा सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज रावेर पोलिसांनी जप्त केला. या बाबत नऊ जणांविरुद्ध रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon Crime Gambling den raided in Utkhed news)

येथील पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार उटखेडा शिवारातील नकट्या नाल्याच्या शेजारी पडिक जमिनीवर उघड्यावर झन्ना मन्ना जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानुसार पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, पोलिस कर्मचारी प्रमोद पाटील, समाधान ठाकूर, राहुल परदेशी, महेश मोगरे, अमोल जाधव यांच्या पथकाने छापा टाकून १५ हजार ५०० रुपये रोख,

एक कॅटचा बॉक्स व पत्त्याचा कॅट, ५ ऍन्ड्राईड व २ साधा बटनाचा असे ४८ हजार रुपये किमतीचे ७ मोबाईल, दोन लाख ४० हजार रूपयांच्या ७ दुचाकी असे एकूण तीन लाख तीन हजार ५०० रुपयांचा ऐवज जुगार खेळत असलेल्या ठिकाणाहून पोलिसांनी जप्त केला.  (latest marathi news)

या बाबत पोलिस कर्मचाऱ्यांनी विशाल पाटील यांनी रावेर पोलिस ठाण्यात राहुल भालेराव (कुसुंबा खुर्द), कादर तडवी (लोहारा), मोसिन तडवी (रावेर), कलिम खाटीक (लोहारा), फिरोज तडवी (लोहारा), विकास पवार (लोहारा), सुलेमा तडवी (लोहारा), मुकेश भालेराव (कुसुंबा खुर्द), काशीनाथ धनगर (सावखेडा), या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागला...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे १०० नेते दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT