Crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : जळोद येथे 17 लाखांचा गुटखा जप्त

Jalgaon Crime : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची इतर राज्यातून वाहतूक करणाऱ्या वाहनावर अमळनेर पोलिसांनी कारवाई केली.

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची इतर राज्यातून वाहतूक करणाऱ्या वाहनावर अमळनेर पोलिसांनी कारवाई केली असून, त्यात १७ लाख ३२ हजार रुपये किमतीचा गुटखा व इतर मुद्देमाल शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी सातच्या सुमारास जळोद (ता. अमळनेर) येथून जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Jalgaon Crime Gutkha worth 17 lakhs seized in Jalna)

येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाळकर, पोलिस निरीक्षक विकास देवरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित सावळे यांना मध्य प्रदेशातून गुटखा वाहतूक करणारे वाहन जळोद मार्गे अमळनेरकडे जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर पोलिस कर्मचारी हितेश बेहरे, जयंत सपकाळे, गणेश पाटील.

हर्षल पाटील, नीलेश मोरे, बागडे, तसेच दोन पंच यांच्यासमवेत जळोद गावाजवळील दरवाजाजवळ सापळा लावला असता शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी सातच्या सुमारास हातेडकडून अमळगावकडे जाणारी महिंद्रा पीकअप (एमएच ०१, डीआर ११०८) ही गाडी सापळा लावलेल्या पथकाने थांबविली व चालकाला विचारपूस केली असता त्याने मध्य प्रदेशातील एका शेतातून विमल गुटख्याची वाहतूक करीत असल्याची माहिती दिली. (Latest marathi news)

त्यानुसार पथकाने वाहनाची तपासणी केली असता वाहनात ७ लाख ७७ हजार रुपयाचा ४ निळ्या गोणीतील विमल गुटखा, १ लाख ४२ हजार रुपयाचा पाच पांढऱ्या गोणीतील विमल गुटखा, आठ लाख रुपये किमतीची महिंद्रा पीकअप वाहन, पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण १७ लाख ३२ हजार ४८० रुपये किमतीचा मुद्देमाल जमा करण्यात आला असून.

हितेश बेहरे यांच्या फिर्यादीनुसार अमळनेर पोलिसांत वाहनचालक छोटू रमेश भिल व क्लीनर सुनील आसाराम भिल (रा. हेंकळवाडी, ता. जि. धुळे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित सावळे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking Crime Incident : शेजाऱ्याचे आईसोबत संबंध, नंतर मुलीसोबत अतिप्रसंगाचा प्रयत्न; पण तरुणीने जे केलं ते भयानक...

MOVIE REVIEW: पटापट दाखवण्याच्या नादात हरवलं भावनांचं कनेक्शन; 'क्रांतीज्योती विद्यालय'चे सचिन खेडेकर एकमेव तारणहार

Latest Marathi News Live Update :ताम्हिणी घाटात अपघात, २५ जण जखमी

Jaysingpur Election : अधिकारी निवडणूक ड्युटीवर, जयसिंगपूर पालिकेचा कारभार मात्र रामभरोसे

Success Story: सैनिकी परंपरेला नवे पंख! सुभेदाराची मुलगी फ्लाइंग ऑफिसर बनून वायुसेनेत दाखल, वाचा श्रेजलची कहाणी

SCROLL FOR NEXT