The local crime branch team with the suspects. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : मध्य प्रदेशातील ‘बॅग लिफ्टर’ टोळीचा म्होरक्या अटकेत! पारोळा स्टेट बँक परिसरातील चोरीनंतर अटक

Jalgaon News : मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात शिरायचे चार-दोन दिवस रेकी करून बँका, कापूस जीनिंग आणि शेतमालाची ने-आण करणाऱ्या संस्थांबाहेर दबा धरून बॅग लिफ्टींग करून पळ काढायचा.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात शिरायचे चार-दोन दिवस रेकी करून बँका, कापूस जीनिंग आणि शेतमालाची ने-आण करणाऱ्या संस्थांबाहेर दबा धरून बॅग लिफ्टींग करून पळ काढायचा. मध्य प्रदेशातील टोळीच्या म्होरक्याला स्थानिक गुन्हेशाखेने पारोळ्यातून अटक केली. त्याच्या साथीदारांनी एक दिवस अगोदर केलेल्या बॅग लिफ्टींगच्या गुन्ह्यातील रोकडही त्याच्या ताब्यात मिळाली. (leader of bag lifter gang in Madhya Pradesh has been arrested)

स्टेट बँकेच्या पारोळा शाखेतून काढलेल्या रकमेची बॅग अलगद लंपास केली होती. वरिष्ठ निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील नंदलाल पाटील, भगवान पाटील यांना संशयिताच्या वर्णनाची माहिती मिळाली. पारोळा शहरातील धरणगाव माथाळा भागात एका परप्रांतीय संशयितास चौकशीसाठी ताब्यात घेतले.

त्याने त्याचे नाव बसंत बनवारीलाल सिसोदिया (वय ३०, रा. कढीयागाव, ता. पचोर, जि. राजगढ, मध्य प्रदेश) असे सांगितले. चौकशीत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्याजवळ ३ लाख १८ हजारांची रोकड मिळून आली. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने साथीदार रिशी सिंगदर सिसोदीया व विशाल ऊर्फ मोगली सिसोदीया (रा. गुलखोडी, ता. पचोर जि. राजगढ) यांनी मिळून पारोळा स्टेट बँकेबाहेर एका ग्रामस्थाची बॅग लांबविल्याची कबूल केले. (latest marathi news)

गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे, नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भगवान पाटील, राहुल बैसाणे, ईश्वर पाटील, चालक प्रमोद ठाकूर यांनी पुढील तपासासाठी पारोळा पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्या टोळीने यापूर्वी धरणगाव, पाचोऱ्यासह इतर ठिकाणी बॅग लिफ्टींगचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून, इतरही गुन्ह्याचा उलगडा होणार असल्याचे निरीक्षक बबन अव्हाड यांनी सांगितले. त्याच्या टोळीतील इतर साथीदारांचा पेालिस शोध घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: 24 तासांत 1,31,000 कोटी रुपयांचे नुकसान; इलॉन मस्क यांची संपत्ती रोज कमी का होत आहे?

kalyan Crime : कल्याण हादरले ! धावत्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, ठाण्यातून अपहरण केले अन्...

वाढलेले थायरॉईड कमी करण्यासाठी कोणते फळ खावे? वाचा एका क्लिकवर

उपायुक्तच बनल्या मालकीणबाई? मसाज, भांडीकुंडी अन् धमक्या… व्हिडिओ व्हायरल! सफाई कामगार महिलेचे धक्कादायक आरोप

समलैंगिक संबंध, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; CAची आत्महत्या; 22 वर्षीय तरुणीसह दोघांना अटक

SCROLL FOR NEXT