MPDA  esakal
जळगाव

Jalgaon Crime : वर्षभरात 61 व्यक्तींवर ‘एमपीडीए’; जिल्हाधिकाऱ्यांची वर्षपूर्ती

Jalgaon News : जिल्हा प्रशासनाने गेल्या वर्षभरात एमपीडीए अधिनियम १९८१ अंतर्गत ३३ धोकादायक व्यक्ती, ५ वाळू तस्कर व २३ हातभट्टीवाले, असे एकूण ६१ व्यक्तींवर स्थानबद्धतेची कारवाई केली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्हा प्रशासनाने गेल्या वर्षभरात एमपीडीए अधिनियम १९८१ अंतर्गत ३३ धोकादायक व्यक्ती, ५ वाळू तस्कर व २३ हातभट्टीवाले, असे एकूण ६१ व्यक्तींवर स्थानबद्धतेची कारवाई केली. शस्त्र अधिनियम १९५९ मधील तरतुदीनुसार एकूण ३५७ जणांचे शस्त्र परवाने रद्द केले आहेत. आयुष प्रसाद यांनी जळगाव जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारायला वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त त्यांनी ही माहिती दिली. (MPDA on 61 persons in year)

ही कामे ठरली प्रभावी

सिटीझनशिप ॲक्ट अंतर्गत एकूण २८ परदेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र मिळण्याबाबत शासनास प्रस्ताव सादर केले आहेत. त्यापैकी १२ प्रस्तावांना मंजुरी मिळाली, तर १६ प्रस्तावांवर कार्यवाही सुरू आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विविध घटनांमधील ४२ लाखांचे अर्थसाहाय्य मृत व्यक्तीच्या वारसांना देण्यात आले.

२०२३-२४ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीत मनुष्यहानींतर्गत ५९ लाख ४६ हजारांचे अर्थसाहाय्य बाधित कुटुंबांना देण्यात आले. पशुहानी अंतर्गत २ कोटी ९५ लाख व १ लाख १२ हजारांचे अर्थसहाय्य बाधित कुटुंबांना वितरित झाले. घर पडझड अंतर्गत ५७ लाख सहा हजारांचे अर्थसहाय्य बाधित कुटुंबांना वितरित झाले.

दोन दिवसांपेक्षा क्षेत्र पाण्यात बुडाल्यांतर्गत १३ लाख ४० हजारांचे अर्थसाहाय्य बाधित कुटुंबांना देण्यात आले. ई- फेरफार घोषणापत्र ४ चे जिल्ह्यातील १५०४ गावांचे काम पूर्ण करण्यात आले. ई चावडी ऑनलाईन मागणी निश्चिती कामकाज जिल्ह्यातील १५०४ गावांचे पूर्ण करण्यात आले. ई- रेकॉर्ड बल्‍क साईनिंग कामकाज ९८.८१ टक्के पूर्ण करण्यात आले. ई- पीक पाहणी कामकाज खरिपाचे ९७.९८ टक्के, तर रब्बीचे ८८.६५ टक्के पूर्ण करण्यात आले. (latest marathi news)

ई फेरफार नोंद मंजुरीसाठी लागणारा सरासरी कालावधी कमी करून अनडिस्प्यूटेड अनोंदणी कृतसाठी १४ दिवस, तर अनडिस्प्युटेड नोंदणी कृतसाठी २२ दिवसांपर्यंत आणण्यात आला. शासन नियमानुसार जिल्ह्यातील कोतवाल संवर्गातील ८० रिक्त पदांची भरती करण्यात आली. पोलिसपाटील संवर्गातील ३४३ रिक्त पदांची भरती करण्यात आली.

महसूल विभागात एकूण ४४ पदांची वर्ग ३ संवर्गात अनुकंपा भरती करण्याची अंतिम कार्यवाही केली. २०२३-२४ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे, तसेच अवकाळी पावसामुळे एकूण २ लाख ३२ हजार ४५१ शेतकऱ्यांचे पीक व फळ पिकांचे नुकसान झाले. प्राप्त अनुदानापैकी डीबीटी प्रणालीद्वारे निधी वितरित करण्यात आला.

वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत २५.८३ कोटी, तर विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत २०.६८ कोटी निधी मिळाला. १०० टक्के निधीचे वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील विकासकामांची गुणवत्ता वाढीसाठी सर्व अभियंत्यांची कार्यशाळा घेतली. शासकीय तंत्रनिकेतन व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे विकासकामांची पाहणी करण्यात आली. पर्यायाने विकासकामांच्या गुणवत्तेत सुधारणा झाली.

जळगाव जिल्ह्याचा विकास आराखडा तयार केला असून, आराखड्याचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर सादरीकरण करण्यात आले. गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीसंदर्भात १०३१ प्रकरणांत कारवाई करून ७५ कोटी ९ लाख ३३ हजार दंडाची रक्कम शासनाकडे जमा केली आहे.

तलाठी भरती अंतिम टप्प्यात

तलाठीपद भरती २०२३ मधील परीक्षेत उत्तीर्ण झालेले व निवड यादीतील २३१ व प्रतीक्षा यादीतील १८६, असे एकूण ४१७ उमदेवारांची कागदपत्रे पडताळणी करून भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT