kidnapping crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : जिल्‍हा रुग्णालयातून काका-पुतण्याचे सिनेस्टाईल अपहरण

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल नातेवाइकाला भेटण्यासाठी आलेल्या काका-पुतण्याचे अपहरण करण्यात आले. जवखेडा (ता. एरंडोल) येथील कमल साहेबराव मोरे (वय ५०) यांचा लहान मुलगा किशोर मोरे याने २९ नोव्हेंबरला गुंगीचे औषध सेवन केल्याने त्यास जिल्‍हा रुग्णालयात दाखल केले होते. वॉर्ड नऊमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

त्याच्याजवळ दीपक साहेबराव मोरे (वय २५) होता. त्याला भेटण्यासाठी पुतण्या अविनाश बापू मोरे (२६) व संजय दिलीप मोरे रुग्णालयात आले होते. ३० नोव्हेंबरला कमल मोरे यांनी अविनाशला नाश्ता घेण्यासाठी पाठविले. मात्र, बराच वेळ होऊन तो परत आला नाही, म्हणून संजय मोरे त्याला शोधण्यासाठी गेला.

अविनाश याला गोकुळ राठोड (रा. वराड, ता. एरंडोल) व त्याच्यासेाबत असलेले ८ ते १० तरुण मारहाण करीत होते. पुतण्या अविनाशला सोडविण्यासाठी संजय मोरे यांनी मध्यस्थी केली. मात्र, त्यांनाही या टोळक्याने मारहाण करून बळजबरी उचलून नेले. याबाबत जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात अहपरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT