thief esakal
जळगाव

Jalgaon Crime News : कुटुंबीय गेले लग्नाला चोरट्यांनी मांडली घरात पंगत

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : गणेश कॉलनीतील शिवसागर अपार्टमेंटमधील रहिवासी तन्मय पिले यांचे बंद घर चोरट्यांनी फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली. पिले कुटुंबीय नातेवाइकांकडे लग्नासाठी नाशिकला गेले होते. चोरट्यांनी त्यांचे घरी चोरी केल्याचे कळाल्यावर त्यांनी जळगाव गाठले.

लाँड्री व्यवसायिक तन्मय पद्माकर पिले शुक्रवारी (ता. २) पहाटे पाचला कुटुंबासह नाशिकला लग्नासाठी कारने गेले होते. हीच संधी साधत चोरट्यांनी पिले कुटुंबियांच्या घरात डल्ला मारून सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकडवर हात साफ केला. दुपारी दोनला तन्मय पिले यांना त्यांच्या शेजारी राहणारे अविनाश झोपे यांचा फोन आला. त्यांनी तुमच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा असून, तुम्ही कुठे आहेत, अशी विचारणा केली.

तेव्हा पिले यांनी ‘आम्ही नाशिकला असून, तुम्ही घरात जाऊन बघा काय झालयं नेमके’, असे सांगितले. झोपे यांनी घरात पाहणी केली असता, त्यांना फ्लॅटमधील लोखंडी, लाकडी कपाट फोडलेले व कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले. त्यांनी लागलीच ही बाब पिले कुटुंबियांना सांगितली.

सायंकाळी पिले कुटुंबाने जळगाव गाठले. घरात पाहणी केली. तन्मय यांना त्यांच्या पत्नीने स्टीलच्या डब्ब्यात ठेवलेले ४७ हजारांची रोकड, कपाटातील लॉकरमधील २३ हजार रुपये, ४० हजारांचे मंगळसूत्र, २० हजारांची सोन्याची चेन, सहा हजारांची अंगठी, २० हजारांचे ब्रेसलेट, १० हजारांचे सोन्याचे कानाचे टॉप्स, दोन हजारांचे एक सोन्याचे पान, १ हजारांचे चांदीचे चार ग्लास, असा एकूण दोन लाख नऊ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT