Crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : चुकीच्या उपचाराने रुग्ण मरणासन्न अवस्थेत; कुटुंबीयांची जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार

Jalgaon Crime : सोनवद येथील ७० वर्षीय वृद्धेला हृदयविकाराचा झटका आला होता. जळगाव शहरातील दोन न्युरोलॉजिस्ट डॉक्टरांनी चुकीचे निदान करून मेंदूत ब्लॉकेज असल्याचे सांगून त्यांच्यावर शास्त्रक्रिया केली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : सोनवद (ता. धरणगाव) येथील ७० वर्षीय वृद्धेला हृदयविकाराचा झटका आला होता. जळगाव शहरातील दोन न्युरोलॉजिस्ट डॉक्टरांनी चुकीचे निदान करून मेंदूत ब्लॉकेज असल्याचे सांगून त्यांच्यावर शास्त्रक्रिया केली. रुग्ण मरणासन्न अवस्थेत पोचली असून, या उपचारासाठी तब्बल साडेआठ लाख रुपये उकळण्यात आले. चुकीच्या उपचाराने रुग्णमहिलेस मृत्यूच्या दाढेत लोटणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी, यासाठी कुटुंबीयानी जिल्‍हा शल्यचिकित्सक, पोलिस अधीक्षकांना तक्रार दिली आहे. (Jalgaon Crime)

सोनवदचे जितेंद्र जयस्वाल यांच्या आई ललिता आत्माराम जयस्वाल यांना ७ फेब्रुवारीला सकाळी सातला हृदयविकाराचा झटका आला. त्यांना जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासणी अंती ललिता जयस्वाल यांच्या मेंदूमध्ये पाच ब्लॉकेज असल्याचे निदान केले. तेथून दुसऱ्या न्युरोलॉजिस्ट यांच्या रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.

तेथे डॉक्टरांनी तातडीने मेंदीची शस्रक्रिया करण्यास सांगितले. शस्त्रक्रियेसाठी साडेपाच लाख रुपये आणि मेडिकल खर्च केला. शस्त्रक्रियामुळे प्रकृती न सुधारता गंभीर होत गेली. (latest marathi news)

अशा परिस्थितीत डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला व नातेवाइकांकडून ऑपरेशनसाठी ५ पाच लाख ५० हजार, तीन लाख ८० हजार, असे नऊ लाख तीस हजार रुपये उकळण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या सुचनेनुसार जयस्वाल कुटुंब जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले होते. वैद्यकीय समिती समक्ष उपचारांची चौकशी होऊन गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET UG Result : अन्सर कीमध्ये ६०९, निकाल लागताच ५४० पण दोन तासांनी १६७ गुण; नीट निकालात गोंधळ, विद्यार्थीनीचे गंभीर आरोप

IND vs ENG: लॉर्ड्सवर रोहित-कोहली रचणार इतिहास! सचिन-द्रविडलाही मागे टाकत करणार '400'चा महाविक्रम

Latest Marathi News Live Update : शिक्षण, आरोग्यसेवा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत सरकार अपयशी - AICC सरचिटणीस सचिन पायलट

Beed News: भ्रष्टाचार उघड होताच रातोरात काम सुरू? बीडमध्ये नेमकं काय घडलं?

सोनम वांगचुक यांची प्रकृती कशी आहे? डॉक्टरांनी दिली अधिकृत माहिती, पत्नीचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT