Two personnel of Bhadgaon police were injured when their vehicle overturned during a cinestyle chase of diesel thieves. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : सिनेस्टाइल पाठलागानंतर चोरटे गजाआड पोलिसांचे वाहन उलटले

Jalgaon Crime : डिझेलची चोरी करणाऱ्यांचा सिनेस्टाइल पाठलाग करताना भडगाव पोलिसांचे वाहन उलटून दोन कर्मचारी जखमी झाले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : डिझेलची चोरी करणाऱ्यांचा सिनेस्टाइल पाठलाग करताना भडगाव पोलिसांचे वाहन उलटून दोन कर्मचारी जखमी झाले. याचवेळी चोरट्यांची स्विफ्ट गाडी रस्त्यावरील वीज खांबावर धडकली. या अपघातानंतर पळून जाणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी जीवाची पर्वा न करता मोठ्या शिताफीने पकडले. हा सर्व थरार शुक्रवारी (ता. २६) रात्री दीडच्या सुमारास शहरातील भडगाव रोडवर घडला. (Police vehicle overturned by thieves after cinematic chase )

चोरट्यांकडे मिळून आलेले साहित्य पाहता, चोरीची मोठी घटना टळल्याचे दिसून येत आहे. पोलिसांतर्फे सध्या रात्रीची गस्त घातली जात आहे. गुन्हे शोध पथकातील अंमलदार आशुतोष सोनवणे, शिपाई रवींद्र बच्छे व पवन पाटील हे तिघे डी. बी. मोबाईल वाहनावर रात्री गस्त घालत असताना त्यांना स्विफ्ट डिझायर कार (एमएच ०४ एफए ३०४४) संशयास्पदरीत्या हिरापूर रोडवर दिसून आली.

त्यांनी तत्काळ रात्रीच्या गस्तीवरील इतर अंमलदारांना कळविल्यावर चालक संदीप सोनवणे यांच्यासह मनोहर पाटील व किरण पाटील हे पोलिस कर्मचारी अलर्ट झाले. त्यांनी स्विफ्ट डिझायर कारचा पाठलाग केला असता कार भडगावच्या दिशेने भरधाव निघाली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी ओझर गावापर्यंत कारचा पाठलाग केला.

मात्र, कारचा वेग अधिक असल्याने ती पुढे दिसेनाशी झाली. पोलिसांनी या कारची माहिती भडगाव पोलिसांना दिली. भडगावात पोलिसांनी नाकाबंदी केली. स्विफ्ट कार भडगावात दाखल होताच त्यांना पोलिसांची नाकेबंदी दिसल्याने कारचालकाने यू टर्न घेत पुन्हा चाळीसगावच्या दिशेने कार नेली. हे पाहताच भडगाव पोलिसांनी कारचा पाठलाग सुरू केला.

बॅरिकेड्‍‍स उडविले

भडगाव पोलिसांनी तत्काळ कजगाव येथील पोलिस कर्मचाऱ्याला सांगून बॅरिकेड्‍स लावले. चाळीसगाव पोलिसांनीही वाघळी, पातोंडा गावाजवळ तसेच शहरातील खरजई नाक्यावर बॅरिकेड्‍स लावले. कारचालकाने कजगावसह इतर तिन्ही ठिकाणांचे बॅरिकेड्‍स तोडले व सुसाट वेगाने कार नेली. पोलिस नाकाबंदी करून उभे असताना त्यांच्या अंगावर चालकाने कार नेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कर्मचारी बाजूला झाल्याने अनर्थ टळला.

या कारच्या मागे असलेल्या भडगाव पोलिसांच्या वाहनाने वाणी मंगल कार्यालयाजवळ कारला ‘ओव्हरटेक’ केल्यावर कारचा कट पोलिसांच्या वाहनाला लागला. गाडीला वेग असल्याने पोलिसांची गाडी रस्त्यावरच उलटली. खरजई नाक्यावरील बॅरिकेड्‍‍स तोडल्याने चाळीसगावचे पोलिस कर्मचारी शशिकांत महाजन, महेंद्र पाटील, भूषण पाटील, राकेश महाजन, समाधान पाटील, विजय पाटील, सतीश पाटील, नीतेश पाटील, विजय महाजन हेही कारच्या मागेच होते.

कारही खांबावर धडकली

चोरट्यांच्या कारने पोलिसांच्या गाडीला कट मारल्यावर कारचालकाचा ताबा सुटला व त्यांची कार रस्त्यावरील विजेच्या खांबावर धडकली. त्याचवेळी त्यांच्या मागे असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी सुरवातीला अपघातग्रस्त वाहनातून पोलिस कर्मचाऱ्यांना बाहेर काढले व इतरांनी चोरट्यांच्या कारकडे धाव घेतली. कारमधील तीन चोरटे पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले. आकाश बाळासाहेब कुडे (वय २२, रा. कोराडे, ता. राहता, जि. अहमदनगर), मनोज अशोक वाघमारे (३२, रा. कालिकानगर, शिर्डी, जि. अहमदनगर व रशीद रफीक पठाण (२६, रा. वाकळी, ता. राहता, जि. अहमदनगर) अशी संशयितांची नावे आहेत.

मोठा अनर्थ टळला

चोरट्यांच्या स्विफ्ट डिझायर कारची पोलिसांनी झडती घेतली असता, त्यात डिझेल चोरीच्या उद्देशाने ठेवलेले आठ रिकामे ड्रम, डिझेल काढण्यासाठी लागणारे दोन पाईप, याशिवाय एक पेंचिस, स्कू ड्रायव्हर, लोखंडी सळई आदी साहित्य मिळून आले. त्यामुळे संशयित डिझेल चोरी करणारे असल्याचे दिसून येत असले, तरी त्यांच्याकडे मिळून आलेले साहित्य पाहता, ते चोरीच्या उद्देशाने या भागात आले नसावेत, असा संशय व्यक्त होत आहे.

त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला. याबाबत भडगावचे पोलिस कर्मचारी मनोहर पाटील यांच्या तक्रारीवरून तिघांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेत भडगाव पोलिस ठाण्याचे अंमलदार मनोहर पाटील, शिपाई संदीप सोनवणे, चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याचे आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे, नाकाबंदी करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करणारे गणेश महाजन व यश पाटील हे नागरिक बॅरिकेड्‍स लागल्याने जखमी झाले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार

या घटनेत भडगाव व चाळीसगावच्या पोलिसांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, संशयितांचा पाठलाग करून त्यांना जेरबंद केले. याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलिस अधिकारी अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप पाटील व पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार (भडगाव) यांनी कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT