The family of the deceased wailing at the spot esakal
जळगाव

Jalgaon Crime: सुप्रीम कामगाराचा गळा चिरून खून; कंजरवाड्यात रस्त्यावर हत्या करून तिघे फरारी; दोन तासांतच 3 संशयितांना अटक

Crime News : इच्छादेवी चौकात उतरून पायी नाथवाड्याकडे जात असताना कला भवनासमोरच सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी वाळूच्या ढिगाऱ्यावर बसलेल्या काही टपोरी तरुणांनी त्यांची टर उडवली अन...

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime : शहरातील सिंधी कॉलनी रोडवर नाथवाडा-कंजरवाडा परिसरात खासगी कंपनीतील कामगाराचा गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (ता. ३) पहाटे उघडकीस आली. ललित प्रल्हाद वाणी (वय ४५) असे मृताचे नाव आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, तीन संशयितांना अटक झाली आहे. (Jalgaon Crime Supreme worker throat slit)

नाथवाडा परिसरातील ललित वाणी गाढेगावच्या सुप्रीम कंपनीत कामगार होते. ड्यूटी संपल्यानंतर रात्री पावणेबाराच्या सुमारास ते घराकडे निघाले. रात्री बाराला इच्छादेवी चौकात उतरून पायी नाथवाड्याकडे जात असताना कला भवनासमोरच सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी वाळूच्या ढिगाऱ्यावर बसलेल्या काही टपोरी तरुणांनी त्यांची टर उडवली.

वाणी यांनी टपोरी तरुणांना प्रतिउत्तर देताच तिघेही त्यांच्या अंगावर धावून गेले. एकाने धारदार शस्त्र वाणी यांच्या गळ्यावर फिरवले, तर दुसऱ्याने पोटात खुपसले. तेथेच ललीत वाणी खाली कोसळले. ते खाली पडताच तिघांनी तेथून पळ काढला.

पहाटे आढळला मृतदेह

पहाटे पाचला परिसरातील रहिवाशांची ये-जा सुरू झाल्यावर वाळूच्या ढिगाऱ्याजवळ कोणी झोपलेय म्हणून सहसा कुणाचे लक्ष गेले नाही. मात्र काही वेळाने ललीत वाणी पडलेल्या ठिकाणी रक्ताचे थारोळे दिसून आल्यावर लोकांनी जवळ जाऊन बघितल्यावर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन अव्हाड, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती मिळताच अप्पर अधीक्षक अशोक नखाते, उपअधीक्षक संदीप गावित घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह जिल्‍हा रुग्णालयात रवाना करण्यात आला. (latest marathi news)

दोन तासांत संशयित अटकेत

सहाय्यक पोलिस निरीक्षक आसाराम मनोरे, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण सोनवणे, छगन तायडे, विनोद आसकर, राहुल रगडे, साईनाथ मुंडे, विशाल कोळी, सिद्धेश्वर डापकर यांनी परिसरात चौकशीला सुरवात केली.

वाळूच्या ढिगाऱ्यावर तुकाराम वाडीतील दोन तरुण कंजरवाड्यातील एकासोबत दारू पिऊन बसल्याची माहिती पोलिसांना मिळताच संशयित कमल किशोर बागडे (वय २०, रा. कंजरवाडा), हेमंत ऊर्फ हुल्या सपकाळे (२०, तुकाराम गाडी) व युवराज कैलास पाटील (१८, जानकीनगर) यांना ताब्यात घेताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

सहा महिन्यांत होणार होते पर्मनंट

ललीत वाणी प्रामाणिक कामगार होते. येत्या सहा महिन्यात ते पर्मनंट होणार होते. तत्पूर्वीच विपरीत घडले अन्‌ त्यांचा जीव गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT