Police officers and personnel including the seized bike and the arrested suspect. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : चोरीच्या 5 दुचाकींसह संशयित पोलिसांच्या जाळ्यात! जिल्ह्यात विविध ठिकाणाहून चोरल्या दुचाकी

Crime News : या संशयिताच्या ताब्यातून चोरी केलेल्या १ लाख ५० हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी बाजारपेठ पोलिसांनी हस्तगत केल्या असून, तपास सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिसांनी सराईत दुचाकी चोरट्यास अटक केली असून, त्याच्याकडून दीड लाख रुपये किमतीच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. (Jalgaon Crime Suspect in police custody with 5 stolen bike)

शहरासह परिसरात दुचाकी चोरीचे प्रमाण कमालीचे वाढले असून, भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीत ४ मेस फिर्यादी भरत शालिग्राम बांडे (रा. विठ्ठल मंदिर वाॅर्ड, भुसावळ) यांच्या घरासमोरून ३० हजार रुपये किमतीची दुचाकी (बजाज प्लॅटिना : एमएच १९, डीएन ५३४९) चोरी झाल्याची तक्रार होती.

या दुचाकीच्या तपासाकामी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोलिस उपनिरीक्षक विजय नेरकर, पोलिस कर्मचारी यासिन, सत्तार पिंजारी, महेश चौधरी, सोपान पाटील, राहुल वानखेडे, सचिन चौधरी, भूषण चौधरी, जावेद शहा यांचे पथक तयार करण्यात आले. (Latest marathi News)

या गुन्ह्यांच्या तपासात आरोपीचा शोध घेत असताना संशयित किरण उर्फ करण शालिग्राम पाटील (वय २५. रा. गजानन महाराज मंदिराजवळ, मुक्ताईनगर) हा या गुन्ह्यातील आरोपी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीत आल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाल्याने त्याला रविवार (ता. ५) ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्यांसंबधी चौकशी केली असता त्याने विविध पोलिस ठाणे हद्दीतून पाच दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. या संशयिताच्या ताब्यातून चोरी केलेल्या १ लाख ५० हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी बाजारपेठ पोलिसांनी हस्तगत केल्या असून, तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं उच्चांकापासून 26 हजारांनी स्वस्त! पाहा ताजा भाव; पुढे सणासुदीच्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?

पत्नीच्या खून प्रकरणी पती-सासऱ्यासह ८ जण तुरुंगात गेले, १२ वर्षांनी जिवंत सापडली महिला

MPSC Exam Success Story : शेतकरी बापाची लेक अन् आई पोलिसात! जाधववाडीच्या निकिताची MPSC मध्ये गगनभरारी, महसूल सहाय्यकपदी निवड

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Caste Validity Certificate : जातवैधता प्रमाणपत्राचा आग्रह न धरता तात्पुरता प्रवेश द्या; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

SCROLL FOR NEXT