Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : जिल्ह्यातील दोघांवर MPDAची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यातील दोन जणांवर महसूल प्रशासनाने एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली.

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी याबाबतचे आदेश दिले. प्रकाश चंद्रकांत कंजर (वय ३४, रा. खंडेरावनगर, जळगाव) व सोनू रामेश्वर पांडे (२८, भुसावळ), अशी दोघांची नावे आहेत. (Jalgaon Crime Update On two in district Action of MPDA One to Than other to Yerwada Jalgaon Crime News)

प्रकाश कंजर हातभट्टीवाला

खंडेरावनगरमधील प्रकाश कंजर हातभट्टीची दारू तयार करून त्याची विक्री करतो. त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यांत ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर एमपीडीएची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस दलाने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता.

त्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी प्रकाश कंजरवर एक वर्षासाठी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली. त्याला ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सोनूवर सहा गंभीर गुन्हे

सराईत गुन्हेगार भुसावळचा सोनू पांडे याच्यावर विविध ६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सोनू पांडे याच्यावर ‘धोकादायक व्यक्ती’ या सदराखाली एमपीडीएची कारवाई केली. त्याला एक वर्षासाठी येरवडा (जि. पुणे) येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे.

आतापर्यंत २१ जणांवर

नोव्हेंबर २०२२ पासून एकूण २१ गुन्हेगारांवर एमपीडीएची कारवाई करण्यात येवून त्यांना स्थानबध्द करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT