Damage to papaya crop due to stormy rains. esakal
जळगाव

Jalgaon Unseasonal Rain Damage : जिल्ह्यात पुन्हा बेमोसमी पावसाचा फटका; चोपडा, अमळनेर तालुक्यात नुकसान

Jalgaon Unseasonal Rain Damage : जिल्ह्यातील चोपडा, अमळनेर, यावलसह काही भागांत शुक्रवारी (ता.१) दुपारी झालेल्या बेमोसमी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Unseasonal Rain Damage : जिल्ह्यातील चोपडा, अमळनेर, यावलसह काही भागांत शुक्रवारी (ता.१) दुपारी झालेल्या बेमोसमी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. चोपडा तालुक्यातील पश्‍चिम भागातील वढोदा येथे दुपारी साडेतीनच्या सुमारास पाऊस व वादळी वाऱ्याने अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात पपई, मका, केळी पिकाचे नुकसान झाले आहे. (Jalgaon Crops damaged due to unseasonal rains in some parts of district)

वढोदा येथील छगन बळीराम पाटील या शेतकऱ्याचे कापणीवर आलेली तीनशे पपईची झाडे उद्ध्वस्त झाली. पूर्ण बाग वाऱ्याने उन्मळून गेली. यात प्रताप हिरामण पाटील, वासुदेव पाटील, योगराज पाटील, किशोर पाटील, सतीश पाटील, घुसळू पाटील, विश्वनाथ पाटील, निबा पाटील, विलास पाटील तर

शेखर गोकुळ पाटील यांची पिल्ले केळी बागची झाडे २०० ते ३०० झाडे उन्मळून पडले. जास्त प्रमाणात मका व पपईचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (latest marathi news)

दहिगाव परिसरात नुकसान

दहिगावसह परिसरात बेमोसमी पावसाने गहू, हरभरा, मका पिकाचे नुकसान झाले. शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या पावसाने गहू, मका आणि हरभऱ्याचे नुकसान झाले आहे तर वीटभट्ट्याधारकांची धावपळ झाली. आधीच गव्हावर अळीचा प्रादुर्भाव होता.

त्यात उत्पन्न कमी निघण्याची भीती निर्माण झाली होती आणि त्यातच निसर्गातने बेमोसणी पावसाचा फटका शेतकऱ्याला दिलेला आहे. मका, गहू आणि हरभरा उत्पादित होण्याच्या मार्गावर आहे. उत्पन्न होत असताना पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत शासनाने द्यावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gevarai BJP Leader Balraje Pawar Arrest: गेवराईत भाजपच्या बाळराजे पवारांना मध्यरात्री अटक ; नगरपालिका मतदानाच्या दिवशी झाला होता राडा!

Thane News: उंच टॉवर, स्नो पार्क, टाउन पार्क आणि... ठाण्याच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होणार, भव्य प्रकल्पांची घोषणा

किती घाण दाखवताय... मराठी मालिकेतील नवऱ्याचा क्रूरपणा पाहून प्रेक्षक संतापले; म्हणतात- आताचे पुरुष असे आहेत?

Pune Crime : फसवणूक प्रकरणात धनंजय वाडकर व त्याच्या जावयाच्या घरातून कागदपत्रे जप्त; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई!

Junnar Leopard Attack : ओतूरमध्ये दिवसा ढवळ्या बिबट्याचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी!

SCROLL FOR NEXT