crime news
crime news crime news
जळगाव

जळगाव : सायबर गुन्हेगारांनी शेतकऱ्याला फसवले

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : क्रेडिट कार्ड ‘ॲक्टिव्ह’ करण्याच्या बहाण्याने बेलसवाडी (ता. मुक्ताईनगर) येथील प्रौढाची ९९ हजार ८६२ रुपयात फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथे संजीव श्रीराम पाटील (वय ५४) कुटुंबीयांसह वास्तव्यास असून ते शेतकरी आहेत. ३ ते ५ जानेवारी दरम्यान संजीव पाटील यांच्या घरी पोस्टाने सेंट्रल बँक व स्टेट बँकेचे असे संयुक्त क्रेडीट कार्ड आले.

कुठल्याही बँकेत अर्ज केला नसतानाही पोस्टाने क्रेडीट कार्ड आल्याचा संजीव पाटील यांना आश्चर्याचा धक्का बसला. याच काळात त्यांना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तींनी फोन करुन बँकेतून बोलत असल्याचे भासविले. पोस्टाने घरी आलेले क्रेडीट कार्ड ‘ॲक्टिव्ह’ करण्याच्या बहाण्याने संजीव पाटील यांची ९९ हजार ८६२ रुपयांत ऑनलाईन फसवणूक केली. सायबर गुन्हेगाराने संजीव पाटील यांचा विश्वास संपादन करुन ओटीपी क्रमांक मिळवून त्याद्वारे परस्पर ऑनलाईन खरेदी करुन संजीव पाटील यांच्या खात्यातून पैसे खर्च केले. दोन महिन्यांपासून संबंधितांकडून कुठलाही प्रतिसाद अथवा पैसे परत मिळत नसल्याने अखेर आपली फसवणूक झाल्याची खात्री संजीव पाटील यांना झाली. त्यानुसार त्यांनी सोमवारी (ता. ४) सायबर पोलिसात तक्रार दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल प्रकरणात CM केजरीवाल अन् त्यांच्या पत्नीची चौकशी होणार, महिला आयोग आक्रमक!

Darjeeling Tea: किंमती वाढल्या पण निर्यात घटली; दार्जिलिंग चहा संकटात का आहे?

JEE Advanced Admit Card 2024 : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज मिळणार; असे करा डाऊनलोड

Pakistan Espionage Case : पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी फरार मुख्य आरोपीला अटक; NIA ची कर्नाटकात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

SCROLL FOR NEXT