Cyber Crime esakal
जळगाव

Jalgaon Cyber Crime : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेला गंडा! 10 लाख लंपास; मुंबईतून ठगबाजास अटक

Cyber Crime : शहरातील विद्युत कॉलनीत राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेची शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवत नऊ लाख ८२ हजारांची फसवणूक करण्यात आली होती

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील विद्युत कॉलनीत राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेची शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवत नऊ लाख ८२ हजारांची फसवणूक करण्यात आली होती. जळगाव सायबर पोलिसांत दाखल या गुन्ह्यात मुंबईच्या चेंबूर परिसरातून एका भामट्याला बेड्या ठोकण्यात आल्या. (Jalgaon Cyber ​​Crime woman cheated by lure of investing in stock market news)

शहरातील विद्युत कॉलनी परिसरात राहणाऱ्या या महिलेशी २८ नोव्हेंबर २०२३ ते १५ जानेवारी २०२४ या दरम्यान वेगवेगळ्या चार मोबाईल क्रमांकावरून सायबर गुन्हेगारांनी संपर्क केला. आपण अपेक्स कंपनीमार्फत शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणावर नफा मिळवून देतो, असे सांगितले.

त्यानंतर त्यांनी महिलेला ॲपेक्स नावाचे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याचे सांगून शेअर खरेदी करण्याच्या नावाखाली वेळोवेळी त्यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने नऊ लाख ८२ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात मागवून घेतले. बराच काळ लोटूनही महिलेला नफा आणि मुद्दलचा थांगपत्ताच लागत नसल्याने त्यांना शंका आली. आपली फसवणूक झाल्याचे निदर्षनास आल्यावर त्यांनी १६ जानेवारीला जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.  (latest marathi news)

मुंबईतून संशयिताला बेड्या

दाखल गुन्ह्याचा तांत्रिक तपास सुरू होता. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या तपासात संशयिताचा मागमूस लागत असल्याची माहिती उपलब्ध झाल्यावर पथकातील वसंतराव बेलदार, प्रदीप चौधरी, प्रशांत साळी, हेमंत महाडिक, तसेच जाधव व गौरव पाटील यांच्या पथकाने संशयित अशरफ उमर सय्यद (वय २६, रा. ह. मु. विष्णूनगर, म्हाडा वसाहत, चेंबूर) यास रविवारी (ता. २४) बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT