Death threat to Eknath Khadse  esakal
जळगाव

Jalgaon Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना दाऊदच्या नावाने जीवे मारण्याची धमकी

Jalgaon News : राज्याचे माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांना दाऊद इब्राहिम व छोटा शकील यांच्या नावाने जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आले असल्याची माहिती खडसे यांनी स्वतः दिली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राज्याचे माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांना दाऊद इब्राहिम व छोटा शकील यांच्या नावाने जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आले असल्याची माहिती खडसे यांनी स्वतः दिली. या प्रकरणी त्यांनी मुक्ताईनगर पोलिसांत तक्रार केली असल्याचेही सांगितले. याबाबत श्री. खडसे यांनी सांगितले. (Jalgaon Death threat to Eknath Khadse in name of Dawood)

की सोमवारी (ता. १५) व मंगळवारी (ता. १६) सायंकाळपर्यंत साधारणत: पाच वेळा एक अमेरिकेतून, तर काही उत्तर प्रदेश भागातून मोबाईलवर धमकीचे फोन आले. त्यात दाऊद आणि छोटा शकील यांच्या नावाचा उल्लेख आहे. यात म्हटले आहे, ‘आप की खैर नही है, आपको मारना है’ अशा प्रकारचा उल्लेख आहे. मी त्यांना विचारले, की माझा काय संबंध?

तर त्यावर ते म्हणाले, ‘हमने तय किया है, की आपको मारना है.’ मला वाटलं, कुणी तरी खोडसाळपणा करीत असेल म्हणून मी लक्ष दिले नाही; परंतु वारंवार असे फोन येत राहिल्याने मी पोलिसांना सूचित केले आहे. मागे मनोज भंगाळे नावाच्या व्यक्तीने माझे दाऊदच्या पत्नीशी संभाषण असल्याचे सांगितले होते. त्या वेळी ते फोन कॉल दिले होते, ते कराचीचे होते. (Latest Marathi News)

अशाच प्रकारचा फोन कॉल अमेरिकेतून असू शकतो. संगणकाचा वापर करून अशा प्रकारचे फोन कॉल तुम्हाला नाउमेद करण्यासाठी खोडसाळपणा केला जात असेल, असे मला प्रथमदर्शनी वाटले; परंतु सारखेच कॉल येत असल्याने आपण पोलिसांना कळविले. धमकी देणाऱ्याने आपल्याला काहीही मागितले नाही, मात्र हा खोडसाळपणा असावा.

आता तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे, की मुक्ताईनगरात बसूनही अमेरिकेचा कॉल करू शकतो. हे राजकीय आहे की त्यामागे आणखी काय असावे, हे पोलिस तपासात समोर येईल, असेही खडसे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT