An unpaved bridge on the outskirts of the village. esakal
जळगाव

Jalgaon News : खेडी शिवारात पक्क्या पुलाची मागणी; नाल्याचे पाणी घरात आल्याने नागरिकांचे हाल

Jalgaon News : या नाल्यावर पक्का पूल बांधावा, अशी मागणी नागरिकांनी महापालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव शिवार गट क्रमांक ६० व ६१ आणि खेडी शिवार गट क्रमांक ११-१२-१३ या मधोमध परिसरात सर्वांत मोठा घाण पाण्याचा नाला आहे. या नाल्यावर पक्का पूल बांधावा, अशी मागणी नागरिकांनी महापालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे. (Jalgaon Demand for concrete bridge in Khedi Shiwar)

या नाल्यावर गेल्या २०१६ मध्ये ये-जा करण्यासाठी नागरिकांनी स्वतः खर्च करून पाईप टाकले होते. ते पाईप जड वाहनांमुळे तुटले. दरवर्षी पावसाळ्यात या पाईपांमुळे येणारी या समस्या दूर होण्यासाठी नागरिकांनी नाल्यावर मोरीची मागणी केली. एपिरील, मे महिन्यात हा पूल तयार करून दिला. हा पूल केवळ पाईपचा असल्याने त्यात कचरा, घाण अडकते. त्यामुळे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात जाते. यामुळे नागरिकांचे नुकसान होते.

एमआयडीसी, अयोध्यानगर, खेडी या भागातून येणारा मेन व मोठा नाला हा जळगाव शिवार गट क्रमांक ६०, खेडी बुद्रुक शिवार गट क्रमांक ११/१२/१३ या दोन्हीमधून वाहत आहे. दोन्ही गटांत जाण्या-येण्यासाठी येथील रहिवाशांनी वर्गणीतून तीन ते चार वर्षांपूर्वी नाल्यात पाईप टाकून कच्चा रस्ता नाल्यावर तयार केला होता. (latest marathi news)

जेव्हा मोठा पाऊस होतो, त्यावेळी नाल्याला मोठा पूर येतो. प्रत्येक वेळी त्या पुरात वाहून आलेले लाकडे, केरकचरा व घाण त्या पाईपात अडकते. त्यामुळे पाईपातून पाणी वाहने पूर्णपणे बंद होते. परिणामी, नाल्याचे पाणी नाल्याच्या आजूबाजूने वाहून परिसरात साचते. घरात नाल्याचे घाण पाणी व आजूबाजूच्या परिसरात साचत राहिल्याने आजार वाढले आहेत.

पुराच्या पाण्यामुळे पूल वाहून जातो. त्यामुळे आजारी व्यक्तीला, गंभीर आजारी व्यक्तींला पक्का रस्त्यापर्यंत आणावयास प्रचंड हाल होतात. पुराच्या पाण्यामुळे नाल्याच्या आजूबाजूस अपघात होतात. महापालिका आयुक्तांनी या परिसरातील नाल्यावर पक्का पूल तयार करावा व नागरिकांना जीवघेण्या कच्च्या पुलापासून सुरक्षित करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT