MP Unmesh Patil, Sunil Tiwari of Railways present at the inauguration of railway station redevelopment work under Amrit Yojana. esakal
जळगाव

Jalgaon News : धरणगाव रेल्वेस्थानक पुनर्विकास कामाचे भूमिपूजन; अमृत योजनेंतर्गत होणार कायापालट

Jalgaon News : अमृत योजनेंतर्गत रेल्वेस्थानक पुनर्विकास कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन झाले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील अमृत योजनेंतर्गत रेल्वेस्थानक पुनर्विकास कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन झाले.

या वेळी खासदार उन्मेष पाटील, रेल्वेचे एडीआरएम सुनील तिवारी, एडीएम श्री. अग्निहोत्री, प्रमोद ठाकूर, जळगाव विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, स्टेशन मास्टर निशिकांत ठाकूर, पंकज पांडे, रेल्वे पोलिस दलाचे एसीआय जयपाल सिंग. (Dharangaon Railway Station Redevelopment Work Bhumi Pujan)

जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, ‘सामाजिक समरसता’चे प्रा. रमेश महाजन, काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव डी. जी. पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, ॲड. संजय महाजन, गटनेते पप्पू भावे, विलास महाजन.

शिवसेनेचे प्रवक्ते पी. एम. पाटील, जिल्हा परिषद सदस्य माधुरी उत्तरदे, भाजपचे पी. सी. पाटील, हेडगेवार नगर ग्रामपंचायत उपसरपंच चंदन पाटील, ॲड. वसंतराव भोलाणे, दिलीप महाजन, कन्हय्या रायपूरकर, टोनी महाजन, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, मुख्याध्यापक डॉ. संजीव कुमार सोनवणे, कैलास माळी आदी उपस्थित होते.

या वेळी खासदार उन्मेश पाटील यांनी विकास कामांसाठी सर्वाधिक निधी वापरून अनेक विकासाची कामे मतदार संघात केली असल्याचे सांगितले. पी. आर. हायस्कूल, गुरुकुल इंग्लिश मीडियम, लिटल ब्लॉसम, अँग्लो उर्दू आदी शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेत.

शिवाय या विद्यार्थ्यांना रेल्वे प्रशासनामार्फत आयोजित निबंध, चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वाटप करण्यात आले. प्रतीक जैन यांनी रेल्वे स्थानकात काय विकास होणार या संदर्भात सविस्तर माहिती दिली. प्रतापराव पाटील, सुभाष पाटील, ज्ञानेश्वर जळकेकर महाराज आदींनी मनोगत व्यक्त केले.

स्क्रीनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन उपस्थितांना भावले. प्रतीक जैन यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वितेसाठी किरण वाणी, श्री. बाचपाई यांच्यासह भुसावळ, जळगाव, धरणगाव, अमळनेर रेल्वे प्रशासन, धरणगाव रेल्वे सल्लागार मंडळ, धरणगाव रेल्वे प्रवासी मंडळ आदींनी परिश्रम घेतले.

..अशा असतील सुविधा

अमृत भारत स्टेशन योजनेच्या माध्यमातून रेल्वेस्थानकाच्या इमारतीमध्ये सुधारणा, स्थानकाबाहेर गार्डन, दिव्यांगांसाठी सुविधा, लिफ्ट, किरकोळ विक्रीसाठी जागा ,कॅपिटेरिया, वेटिंग रूम, स्वतंत्र आगमन निगमन गेट, इंडिकेटर,पार्किंग व्यवस्था असे अनेक प्रकारच्या सुविधा होणार आहेत.

धरणगाव स्थानक विकसासाठी २७ कोटी रुपयांची तरतूद आहे. या वेळी धरणगाव मार्गे पुण्यासाठी गाडी, पुरी अजमेर एक्स्प्रेस थांबा, मुंबईसाठी नव्याने गाडी अशा मागण्या करण्यात आल्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT