Collector Ayush Prasad while discussing with officials at District Government Medical College and Hospital. esakal
जळगाव

Jalgaon District Hospital : जिल्हा रूग्णालयाचे रूप पालटतेय; विशेष नवजात शिशू काळजी कक्ष

जिल्हा नियोजन निधीतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात सुरु असलेल्या कामे आणि सोयी - सुविधामुळे वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे रूप पालटले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon District Hospital : जिल्हा नियोजन निधीतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात सुरु असलेल्या कामे आणि सोयी - सुविधामुळे वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे रूप पालटले आहे.

जिल्हा नियोजन निधीतून ५ कोटी ५७ लाख‌‌ खर्चातून सामान्य रूग्णालयातील विशेष नवजात शिशू काळजी कक्षात नवीन अत्याधुनिक यंत्रसामग्री बसविली आहे. या कक्षाची जिल्हाधिकारी प्रसाद यांनी आज पाहणी केली‌. (jalgaon District hospital is changing jalgaon news)

रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागांत (ओपीडी) केसपेपर काढणे व औषध वितरणासाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळच नव्याने बांधकाम करुन ६ कक्ष उभारण्यात आले आहे. यामुळे रुग्णालयातील रुग्ण व नातेवाइकांची गर्दी कमी झाली‌ आहे. शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्याचे शस्त्रक्रियेपूर्वी निर्जंतुकीकरण करण्यासाठी ‘सीएसएसडी’ विभाग जिल्हा नियोजन निधीतून कार्यान्वित करण्यात आला आहे.

रुग्णालयामध्ये ५ अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह कार्यान्वीत करण्यात आले आहेत. नियोजन समितीत मंजूर असलेल्या १२ खाटांच्या मॉड्युलर आयसीयूचे काम प्रगतिपथावर आहे. रुग्णालयात जळीत कक्षाच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली असून जळीत कक्षाचे काम प्रगतिपथावर आहे.

विनाटाका मुतखडा शस्त्रक्रिया

मुतखडा रुग्णांवर शस्त्रक्रियेची चिरफाड न करता बाहेरून खडे काढण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्री रुग्णालयात येत्या काही दिवसांत कार्यान्वित होणार आहे. नव्या यंत्रसामुग्रीमुळे रुग्णाला भरती करण्याची आवश्यकता नसेल तर त्रासही कमी होईल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांच्या विविध विभागांना आवश्यक असलेल्या यंत्रसामग्रीच्या खरेदीची प्रक्रिया सुरु आहे. यामधून जे साहित्य व यंत्रसामग्री मिळाली आहे.

यंत्रसामग्री बसविण्याचे काम सध्या सुरु आहे. औषधे, किट्स, केमिकल्स तसेच शल्यवस्तू देखील प्राप्त झालेल्या आहेत. संस्थेत असलेल्या रक्त पेढीसाठी आवश्यक असलेले ब्लड बंक व्हॅनच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर व्हॅन उपलब्ध होणार आहे. या विविध सुविधांमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलणार असून अनेक उच्च दर्जाच्या सुविधा येथे उपलब्ध होणार आहेत.

जिल्हाधिकारी प्रसाद यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील अत्याधुनिक यंत्रसामग्री, विविध विभागातील दुरुस्ती दरम्यान सुचना केल्या. अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय गायकवाड व रूग्णालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

९-१० तास काम, ओव्हटाइम नाही, दिवसाला ६५० रुपयेच मिळतात; PMPLच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन, VIDEO VIRAL

धर्मस्थळ प्रकरणात नवा ट्विस्ट! महिलेने केला धक्कादायक खुलासा; 'त्या' पुरलेल्या 100 हून अधिक मृतदेहांचे सत्य उलगडणार?

Anil Ambani: अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढल्या! ED नंतर मुंबईत CBIचा छापा; काय आहे 2,000 कोटींच प्रकरण?

ती प्राजक्ता नाहीच! गोविंदा आणि सुनीताच्या चर्चित घटस्फोटामुळे मराठी अभिनेत्रींची का सुरू आहे बदनामी?

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक

SCROLL FOR NEXT