Secondary school teacher esakal
जळगाव

Jalgaon News : ‘त्या’ कर्मचारी भरतीस स्थगितीसह चौकशीही होणार!

Jalgaon News : विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांनी माध्यमिक पतपेढीने काढलेल्या कर्मचारी भरतीस स्थगिती दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था वारंवार चौकशीच्या फेऱ्यात येताना दिसत असून, मागील आठवड्यामध्ये विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांनी माध्यमिक पतपेढीने काढलेल्या कर्मचारी भरतीस स्थगिती दिली आहे. कर्मचारी भरतीची चौकशी होऊन सुनावणी होणार असून, पतपेढीत होणाऱ्या भरतीत सभासद पाल्यांना प्राधान्य देण्यात यावे. (Jalgaon Divisional Co-Registrar Co-operative Societies Nashik has suspended the recruitment of secondary)

तसे कुठलाही भ्रष्टाचार होऊ नये, म्हणून पतपेढीचे सभासद विनोद दिलीप महेश्री (सावदा) यांनी तक्रार दाखल केली होती. त्यावर भरतीस स्थगिती देण्यात आली. जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांच्या पतसंस्थेचे अंदाजे दहा हजार सभासद असून, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार.

जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ठेवीमधून कर्जवाटप केले जाते. पतसंस्थेचे भाग भांडवल वाढत असते. गेल्या पंचवार्षिक २०१७ पासून अध्यक्ष व कार्यकारी मंडळांनी केलेल्या बेकायदेशीर व अनियमिततेबाबत इमारत जागा खरेदी, नोकरभरती, मुख्य इमारत दुरुस्ती. (Latest Marathi News)

फर्निचर इमारत दुरुस्ती, प.सं. निधी आदींबाबत पतसंस्थेचे सभासद व मुख्य तक्रारदार विनोद दिलीप महेश्री यांनी अनेक वेळा वरिष्ठ सहकार खात्याकडे तक्रारी केल्या आहेत. त्यात त्यांनी पतसंस्था भरतीतील कथित गैरव्यवहाराबाबत तक्रार केली.

त्या अन्वये १२ कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत स्थगिती व चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सोबत विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक, तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव यांनी जामनेर येथील सहकारी संस्था यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT