Healthy Teeth
Healthy Teeth esakal
जळगाव

Healthy Teeth : दातांच्या आरोग्यासाठी दोन वेळा ब्रश करा : डॉ. हेमंत पाटील

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : लहानपणापासून मुलांनी दातांची काळजी घ्यावी. मुलांनी दिवसातून दोन वेळा ब्रश करावा. ही सवय स्वतःला लावली तर भविष्यात अनेक आजारांपासून दूर ठेवता येते. लहान मुलांनी दररोज दूध घ्यावे. त्यामुळे कॅल्शिअममध्ये वाढ होते अशी माहिती दंतरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत पाटील यांनी दिली. (Jalgaon Dr Hemant Patil statement Brush Twice for Healthy Teeth)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (जीएमसी) दंतशल्य चिकित्सा विभागातर्फे जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त जळगावच्या बालसुधारगृहात तेथील मुलामुलींची दंततपासणी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी बालसुधारगृहाच्या अधीक्षिका जयश्री पाटील, अधीक्षक रविकिरण अहिरराव, डॉ. सुयश जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.

डॉ. हेमंत पाटील म्हणाले, की प्रत्येक मुलामुलींची दंततपासणी करण्यात आली. मुलांना दातांचे आरोग्य कसे राखावे, रोज ब्रश कसे करावे याबाबत माहिती दिली. मोठे झाल्यावर व्यसनांपासून लांब राहा. दातांना कॅल्शिअमची अधिक गरज असते.

हे कॅल्शिअम मिळण्यासाठी रोज दूध पिले पाहिजे. यामुळे दातांच्या आरोग्यात वाढ होते. डॉ. करिष्मा सरोदे, डॉ. सतीश सुरळकर, तज्ञ सूर्यकांत विसावे, क्षितीज पवार यांनीही दंततपासणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT