Urja Chat Bot esakal
जळगाव

Jalgaon Urja Chat Bot: वीजबिल जास्त येतेय, घरबसल्या ॲपवर करा तक्रार! वीज कंपनीची नवीन सुविधा; ग्राहकांची वेळ अन पैसे वाचणार

Jalgaon News : मराठी भाषेतील या चॅट बॉटद्वारे महावितरणच्या विविध सेवांबाबत ग्राहकांना प्रश्न विचारता येतात.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : वीज ग्राहकांना अनेक अडचणींना रोज सामोरे जावे लागते. कधी मीटर रिंडीग जास्त घेतले जाते, बिल जास्त येते, वीजपुरवठा खंडित होतो, डीम लाईट असते, अशा अनेक तक्रारी ग्राहकांना असतात. त्या तक्रारी ग्राहकांना महावितरण कंपनीचे ॲप आणि वेबसाइटवर लागलीच सोडवून मिळणार आहेत.

विविध प्रकारच्या सेवाही यावर मिळत आहेत. यामुळे इंटरनेट असल्यास वीजसंबंधीच्या विविध प्रकारच्या सेवा घरबसल्या मिळत आहेत. ‘ऊर्जा चॅट बॉट’ हे २४ तास कार्यान्वित आहे. (Jalgaon Electricity bill complain on urja chat bot app)

आता वीज ग्राहकांच्या संवादपर मदतीसाठी ‘ऊर्जा चॅट बॉट’ महावितरणच्या संकेतस्थळावर व मोबाइल ॲपवर उपलब्ध आहेत. मराठी भाषेतील या चॅट बॉटद्वारे महावितरणच्या विविध सेवांबाबत ग्राहकांना प्रश्न विचारता येतात. नवीन वीज जोडणी, वीजबिल भरणा, तक्रार निवारण आदींबाबत माहिती घेण्याची सोय उपलब्ध आहे. घरगुती, वाणिज्य, औद्योगिक, कृषीचे जिल्ह्यात सुमारे सव्वाआठ लाख ग्राहक आहेत.

एका क्लीकवर माहिती वेबसाइट: www.mahadiscom.in

मोबाइल ॲप : महावितरण

(latest marathi news)

याबाबतची माहिती मिळणार?

नवीन वीज जोडणी, त्यासाठी केलेल्या अर्जाची सद्यस्थिती, वीजबिल भरणा किंवा वीजबिलाचा तपशील, जलद वीजबिल भरणा, मोबाईल क्रमांक, ई मेल नोंदणी, विविध शुल्काचा ऑनलाइन भरणा, गो-ग्रीन नोंदणी, वीज वापर, बिलाच्या कॅलक्युलेटरची माहिती ऑनलाइन मिळणार आहे.

‘ऊर्जा’च्या माध्यमातून संबंधित सेवा ग्राहकांसाठी थेट ऑनलाइनद्वारे उपलब्ध होणार आहेत. संबंधित सेवेची थेट लिंक ग्राहकांना मिळणार आहे. सोबतच वीजपुरवठा खंडित होणे, वीजबिलांसह इतर तक्रारीबाबत संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. तक्रार करण्यासाठी ‘महावितरण’चे चोवीस तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांक, एसएमएस क्रमांक, मिस्ड कॉल सेवा आदींची माहिती चॅट बॉटद्वारे उपलब्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT