Students wade through rainwater in the Municipal High School premises. esakal
जळगाव

Jalgaon News: फैजपूरला रस्त्यावरील पाणी साचते शाळेच्या प्रांगणात; म्युनिसिपल हायस्कूलच्या समस्येकडे पालिकेचे दुर्लक्ष

Jalgaon : अंकलेश्वर-बुऱ्हाणपूर महामार्गालगत म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील अंकलेश्वर-बुऱ्हाणपूर महामार्गालगत म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी थेट हायस्कूलच्या दर्शनी भागात प्रांगणात शिरते. परिणामी, शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने विद्यार्थ्यांना वाट काढून जावे लागत आहे. याकडे पालिका प्रशासनाने अद्यापही लक्ष दिलेले नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ही समस्या कायम आहे. (Faizpur road water accumulates in school premises due to rain )

येथील म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ही ब्रिटिशकालीन शाळा आहे. अलीकडच्या काळात शाळेची दयनीय अवस्था झाली होती. परंतु शाळेचे शताब्दी महोत्सवानिमित्त शाळेचे माजी विद्यार्थी असलेेले महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांनी पुढाकार घेऊन माजी विद्यार्थी व शहरातील नागरिकांच्या पुढाकाराने शाळेची दुरुस्ती, रंगरंगोटी करून शाळा परिसरात वृक्ष लागवड केली. (latest marathi news)

शाळेच्या दर्शनी भागात कच टाकण्यात आला. मात्र शताब्दी महोत्सव साजरा होऊन एक वर्ष उलटत नाही, तोच पावसाळ्यात हायस्कूलच्या समोरील दर्शनी बाजूस पावसाचे पाणी साचू लागले. त्याचा त्रास विद्यार्थ्यांसह शिक्षकांना सहन करावा लागत आहे. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पाण्याचा निचरा करण्यासाठी हा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावावा, अशी मागणी पुढे आली आहे.

पावसाळ्यात उद्भवते समस्या

दरम्यान, अंकलेश्वर-बुऱ्हाणपूर महामार्गालगत म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी थेट हायस्कूलच्या दर्शनी भागात प्रांगणात शिरते. या पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्गच नसल्याने हे संपूर्ण पाणी हायस्कूलमध्ये साचते. या समस्येविषयी पालिकेचे अभियंता यांना मुख्याध्यापक व शिक्षकांनी अनेक वेळा सांगूनही उपाययोजना झाली नाही. साचत असलेल्या या पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT