theft esakal
जळगाव

Jalgaon Crime News : भुसावळ शहरात दुचाकी चोरीचे सत्र थांबेना; नागरिक धास्तावले

Jalgaon Crime : भुसावळ शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने बाहेरील नागरिकांचे रोज येणे जाणे मोठ्या प्रमाणावर सुरू असते.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : भुसावळ शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने बाहेरील नागरिकांचे रोज येणे जाणे मोठ्या प्रमाणावर सुरू असते. मात्र त्यांच्या वाहनांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात दुचाकी चोरीचे सत्र थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. शहरातील म्युनिसिपल हायस्कूलच्या गल्लीतून विजय बाबूराव सरोदे (रा. हनुमाननगर, भुसावळ) यांची १७ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. ही घटना २६ मेस सकाळी ९ ते १० दरम्यान घडली. (fear in citizen due to chain of two wheeler theft in Bhusawal city does not stop )

या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. बहुतांश घटना पोलिसांनी उघडकीसही आणल्या. शहरात दुचाकीधारक दहशतीखाली असून, बाहेरील नागरिकही शहरात येण्यास धास्तावले असल्याने हे सत्र कुठपर्यंत चालणार? पोलिस प्रशासन या चोरांवर नियंत्रण आणणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात मे महिन्यापासूनच दुचाकी चोरीचे सत्र सुरू आहे. विठ्ठल मंदिर वार्डातील भरत शालिकराम बोंडे यांची (४ मे) दुचाकी (एमएच १९, डीएन ५३४९) चोरीस गेली होती.

२५ एप्रिल रोजी मिल्लत नगर, खडका येथील मोहम्मद इसाक देशमुख यांची दुचाकी (एमएच १९, सीसी ४४२७) आठवडे बाजारामधून चोरी झाली. गोविंदा श्रीधर पाटील (रा. विनायक नगर) यांची ॲक्टिवा, सतीश प्रभाकर भोळे यांची (एमएच १९, ईडी ७४४१) क्रमांकाची दुचाकी घराबाहेरून लांबविली. सुनील कैलास वर्मा (रा. नारायण नगर, वरणगाव रोड, भुसावळ) यांची दुचाकी (एमएच १९, ए एच ०५६५) घराबाहेरून चोरी करून नेली. बाजापेठ पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

या प्रकरणी भुसावळ पोलिसांनी दुचाकी चोरांचा छडा लावण्यासाठी पथक तयार करून करण शालिकराम पाटील (रा. मुक्ताईनगर) याला अटक केली होती. त्याच्याकडून विविध पोलिस ठाण्यांतर्गत १ लाख ५० हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत तर २२ मेस बाजारपेठ पोलिस पथकाने एका अल्पवयीन आरोपीकडून न्यू एरिया वाॅर्डातून चोरी केलेल्या विना नंबर प्लेट असलेल्या आठ दुचाकी देखील ताब्यात घेतल्या होत्या. या घटनेत त्याचा साथीदार कोण? हा देखील तपास करण्यात आला होता. मात्र पुन्हा दुचाकी चोरांचे सत्र सुरू झाले.

घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ

पोलिस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमाकांत पाटील तपास करीत आहेत. मात्र दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून, मोठी टोळी भुसावळ शहरात सक्रिय असण्याची शक्यता वर्तविली जात आहे तर पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

SCROLL FOR NEXT