Fire Accident
Fire Accident esakal
जळगाव

Jalgaon Fire Accident : कंपनी व्यवस्थापकासह मालकाला अटक! केमिकल कंपनी स्फोटातील जखमी 2 कामगारांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fire Accident : औद्योगिक वसाहत परिसरात ‘मोरया ग्लोबल लिमिटेड’ या केमिकल कंपनीत बॅायलर स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू होण्यासह २३ जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. १७) घडली होती. जखमींचा जबाब नोंदविल्यावर कंपनी मालक, व्यवस्थापकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यात कंपनी मालक अरुण निंबाळकर, व्यवस्थापक नोमेश रायगडे अशा दोघांना अटक करण्यात आली.

दरम्यान, बुधवारी उपचारार्थ दाखल जखमींपैकी किशोर दत्तात्रय चौधरी (वय ५०, रा. रेणुकानगर, मेहरूण), दीपक वामन सुवा (रा. विठोबानगर, कालिकामाता मंदिर, जळगाव) या दोन कामगारांचा गुरुवारी (ता. १८) मृत्यू झाला. जखमींतील चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

औद्योगिक वसाहत परिसरातील डब्ल्यू सेक्टरमधील मोरया ग्लोबल लिमिटेड या केमिकल्स कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी नऊला घडली होती. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला होता.

कंपनीतील स्फोट प्रकरणी कपिल राजेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून कंपनी मालक निंबाळकर, व्यवस्थापक रायगडे, प्रशासकीय अधिकारी अनिल पवार या तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधासह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. (Latest Marathi News)

कंपनी मालकाला अटक

दाखल गुन्ह्यात पोलिस उपअधीक्षक संदीप गावित यांच्या पथकाने कंपनी मालक निंबाळकर, व्यवस्थापक रायगडे या दोघांना अटक करून गुरुवारी जिल्‍हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची (ता. २०) पोलिस कोठडी सुनावली.

उपचारांच्या खर्चाला सहमती

कंपनी मालक निंबाळकर आणि व्यवस्थापक रायगडे यांनी जखमी कामगारांच्या उपचारांची जबाबदारी स्वीकारली असून, खासगी रुग्णालयात उपचारांचा खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच, मृत कामगारांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईसाठीची ग्वाही कंपनीकडून देण्यात आली.

"दाखल गुन्ह्यात प्रथमदर्शनी प्राप्त पुरावे आणि जखमींचे जबाब नोंदविण्यात आले असून, त्या आधारे तपास करण्यात येत आहे. तपास कामात औद्योगिक सुरक्षा विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला."- संदीप गावित, पोलिस उपअधीक्षक, जळगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 LIVE : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Maharashtra Exit Poll 2024 : अजित पवारांच्या पक्षाला एक्झिट पोलमधून धक्का; किती जागा मिळणार?

Latest Marathi News Live Update: लोकसभेचा शेवटचा टप्पाही उरकला; 59 टक्के मतदानाची नोंद

Baramati Exit Poll : बारामतीचा कल हाती! सुनेत्रा पवारांना धक्का, पुन्हा सुप्रिया सुळेच होणार खासदार?

Ahamadnagar Exit Poll: अहमदनगर लोकसभेत सुजय विखेंना धक्का? EXIT Pollचा अंदाज निलेश लंकेंच्या बाजूने

SCROLL FOR NEXT