Jalgaon Crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलीकडे बळजबरी प्रेमाची मागणी; तिघांविरोधात पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल

Jalgaon News : अल्पवयीन मुलीला बोलावून बळजबरीने प्रेम केले नाही, तर भावाला काहीही करून टाकू, अशी धमकी देणाऱ्या तालुक्यातील पिंपळी येथील तिघांविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : अल्पवयीन मुलीला बोलावून बळजबरीने प्रेम केले नाही, तर भावाला काहीही करून टाकू, अशी धमकी देणाऱ्या तालुक्यातील पिंपळी येथील तिघांविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पिंपळी येथील सातवीत जाणारी १२ वर्षांची मुलगी २९ एप्रिलला सायंकाळी साडेसातला ओट्यावर बसली असताना.

भावेश हनुमंत महाजन (वय १८) व इतर दोन विधीसंघर्ष बालके गल्लीतून जात असताना, भावेशने तिला माझ्या मागे ये, म्हणून बोलावले. मुलीने हा प्रकार आईवडिलांना सांगितला. वडिलांनी तिला त्यांच्यासोबत जायला सांगितले. मुलगी एकाच्या गुदामाजवळ गेली.

तेव्हा भावेश तिला ‘मी तुझ्यावर प्रेम करतो, माझे प्रपोज ऍक्सेप्ट कर नाही, तर मी तुझ्या भावाला काहीही करेल’, अशी धमकी दिली. दोघी अल्पवयीन मुलांनी ‘तू त्याचे प्रपोज ऍक्सेप्ट कर’, असे मुलीला सांगितले. (latest marathi news)

मुलीच्या वडिलांनी हे ऐकल्यावर मुलीला घरी पाठविले. नंतर तिघांनी मुलीच्या वडिलांशी वाद घातले. यापूर्वीही मुलगी शिवमंदिरात जात असताना, तिघे मंदिरावर बसले असायचे, म्हणून मुलीने मंदिरात जाणे बंद केले होते.

याबाबत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक भय्यासाहेब देशमुख तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT