Dadar crop gutted in Shirsoli farm fire sparked by friction of electric wires.  esakal
जळगाव

Jalgaon Fire Accident : तोंडाशी आलेला घास नियतीने हिरावून घेतला! शिरसोलीत दादरीच्या कणसांसह चारा खाक

Jalgaon News : शिरसोली येथे शॉर्टसर्कीटमुळे शेतकऱ्याने काढणी केलेल्या दादरच्या कणसांसह चारा जळून खाक झाला आहे

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शिरसोली येथे शॉर्टसर्कीटमुळे शेतकऱ्याने काढणी केलेल्या दादरच्या कणसांसह चारा जळून खाक झाला आहे. काढून ठेवलेले पीक आणि चाऱ्याला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी (ता.१७ मार्च) संध्याकाळच्या सुमारास घडली. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.

शिरसोली येथील शेतकरी बळवंत पाटील यांचे नायगाव शिवारात शेत असून दोन एकरामध्ये त्यांनी दादर पेरली होती. या पिकाची काढणी करून ते शेतातच चाऱ्यासह ठेवले होते. रविवारी दुपारी पाचच्या सुमारास शेतातील वीज खांबावरील तारांमध्ये घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाले व ठिणग्या दादरच्या पिकावर पडल्या.

त्यामुळे या पिकाने पेट घेतला आणि काही वेळातच संपूर्ण पीक आगीच्या भक्षस्थानी सापडले. या आगीत दादरचे कणसे तसेच चाराही खाक झाला. आग धगधगत असल्याचे दिसताच ज्ञानेश्वर पाटील यांनी शेतमालक बळवंत पाटील यांना माहिती दिली. त्यावेळी त्यांनी शेतात धाव घेतली. (latest marathi news)

त्यांच्यासह आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पाण्याचा मारा करण्यासह झाडांच्या फांद्याने आग विझविली. मात्र तोपर्यंत सर्व पीक खाक झाले होते. शेतात ठेवलेल्या दादरच्या पिकाचे कणसं व चारा सोमवारी वेगवेगळे करून धान्य घरी नेले जाणार होते. मात्र हातातोंडाशी आलेला घास काळाने हिरावून घेतल्याने शेतकरी कुटुंबीय हवालदिल झाले आहे. महसूलने या घटनेचा पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याला मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT