Disability Certificate  esakal
जळगाव

Disability Certificate : हत्तीरोगबाधितांना दिव्यांग प्रमाणपत्र देणे सुरू!

Jalgaon News: केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या सूचनेप्रमाणे हत्तीरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग असणाऱ्या रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या सूचनेप्रमाणे हत्तीरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग असणाऱ्या रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दिव्यांग विभागात बुधवारी (ता. २४) चाळीसगाव येथील तिघांची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली. (Disability Certificate)

केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे व राज्य शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयातर्फे सहसंचालकांनी विविध विभागांना याबाबत ७ मेस पत्र दिले आहे. या पत्रानुसार जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सकांना जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. टी. एस. देशमुख यांनी पत्र देऊन हत्तीरोग रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्याबाबत माहिती दिली आहे.

या अनुषंगाने चाळीसगाव तालुक्यातील सुरेखा हिरामण गांगुर्डे, शोभा यमाजी दहीहंडे आणि अहमद शेख बुढन शेख यांची वैद्यकीय तपासणी सहाय्यक प्रा. डॉ. समीर चौधरी यांनी केली. त्यानुसार दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही सुरू झाली आहे. कार्यवाही अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता तथा दिव्यांग बोर्डाचे अध्यक्ष डॉ. मारोती पोटे. (latest marathi news)

वैद्यकीय अधीक्षक तथा दिव्यांग बोर्डाचे सचिव डॉ. विजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रा. डॉ. समीर चौधरी यांनी केली. तपासणीसाठी दिव्यांग बोर्डातील कर्मचारी विशाल दळवी, चेतन निकम, दत्तात्रय पवार, विश्वजित चौधरी, विशाल पाटील, प्रकाश पाटील आदींनी सहकार्य केले.

अशी होईल कार्यवाही

हत्तीरोग असणाऱ्या रुग्णांना कार्यवाही इतर दिव्यांग रुग्णांप्रमाणे केली जाणार आहे. आधी ऑनलाइन फार्म भरून कूपन घ्यावे लागते. कूपन म्हणजे अपॉइंटमेंट मिळते. त्यामुळे दिव्यांग बांधवांना त्यांच्या तपासणीची तारीख आणि वेळ मिळते. त्या तारखेला त्यांची पूर्ण तपासणी होते. डॉक्टर संबंधिताला दिव्यांगाच्या प्रकार, तीव्रतेनुसार प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करतात. ते दिव्यांग बोर्डात जमा झाल्यानंतर संबंधिताला प्रमाणपत्र तयार झाल्याचा संदेश येतो. प्रमाणपत्र ऑनलाइन मिळते. ते त्यांना डाउनलोड करून प्रिंट काढता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : ''मीसुद्धा तो व्हिडीओ बघितला, पण...''; संजय गायकवाडांनी केलेल्या मारहाणीवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Matru Suraksha Din 2025: मातृत्व अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकार कोणत्या योजना राबवतंय? जाणून घ्या आजच!

बाबो! भाईजान लग्न करतोय? सलमानच्या 'त्या' पोस्टमुळे चर्चेला उधाण, नेटकरी म्हणाले...'दारु पिऊन काहीही...'

Latest Maharashtra News Live Updates: विदर्भात पावसाचा जोर कायम, पुरामुळे बंद झाले 'हे' मार्ग

UAE Golden Visa confusion: 23 लाखांत मिळतोय लाइफटाइम गोल्डन व्हिसा? युएई सरकारने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT