An employee checks a student going for an exam through a metal detector at a center in the city. esakal
जळगाव

Jalgaon NEET Exam : 40 अंश तापमानात ‘नीट’ परीक्षेने काढला भावी डॉक्टरांचा घाम; पालकांचीही कसोटी

NEET Exam : ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’द्वारे घेतली जाणारी वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश पूर्व परीक्षा ‘नीट’ रविवारी (ता. ५) जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध केंद्रांवर सुरळीत पार पडली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon NEET Exam : ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’द्वारे घेतली जाणारी वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश पूर्व परीक्षा ‘नीट’ रविवारी (ता. ५) जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध केंद्रांवर सुरळीत पार पडली. ४३ अंश तापमानात भर दुपारी दोनला परीक्षेची वेळ असल्याने तापमानासह पेपरनेही विद्यार्थ्यांचा घाम काढला. ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांची सिटी कॉर्डिनेटर म्हणून नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारा ‘नीट’ परीक्षेसाठी नेमणूक झाली होती. वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस, आयुर्विज्ञान आणि दंतविज्ञान, बीएचएमएस या शाखांच्या प्रवेशासाठी ‘नीट’ ही प्रवेश परीक्षा ५ मेस सुरळीत झाली. (40 degrees temperature NEET exam made future doctors sweat )

अकरा केंद्र, साडेपाच हजार विद्यार्थी

जळगाव जिल्ह्यात सुमारे ११ परीक्षा केंद्रांवर नीट या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ५ हजार ६९७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. प्रत्येक परीक्षा सेंटरवर परीक्षा व्यवस्थित आणि कोणताही गैरप्रकार न होता सुरळीतपणे पार पडली.

मेटल डिटेक्टर, बायोमेट्रिक

परीक्षेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे ठरवून दिलेल्याप्रमाणे पूर्ण गोपनीयतेचे पालन करण्यात आले होते. प्रत्येक परीक्षा केंद्रावर अधीक्षक, दोन निरीक्षक, पर्यवेक्षक आणि अन्य कर्मचारी, अशी यंत्रणा कार्यान्वित होती. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक सेंटरवर जामर आणि मेटल डिटेक्टर व बायोमेट्रिक यंत्रणा बसविली होती. त्याचबरोबर प्रत्येक परीक्षा केंद्रावर बसवलेले कॅमेरे दिल्लीस्थित केंद्राशी जोडत नियंत्रित केले होते.

नियमांचे तंतोतंत पालन

सिटी कॉर्डिनेटर ते परीक्षा केंद्रापर्यंत पेपर डिस्ट्रीब्युशनसाठीही नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे नियोजनबद्ध वेळ ठरवून दिला होता आणि त्यानुसारच सर्व कामगिरी पार पडली. एवढेच नव्हे, तर सिटी कॉर्डिनेटर यांनाही पेपर कलेक्शनच्या ठिकाणांबद्दल आयत्या वेळेला माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे वेळोवेळी मिळत होती. (latest marathi news)

अशी होती गोपनीयता

पेपरचे बॉक्स ओपन करण्यासाठी त्यांना जीपीएस सिस्टीम कार्यान्वित केली होती. जी विशिष्ट कोडनुसारच ओपन करता येऊ शकत होती. परीक्षेबाबत पूर्वतयारी म्हणून सिटी कॉर्डिनेटर प्राचार्या सुषमा कंची यांनी ३ मेस जळगाव येथे एका ब्रिफिंग सेशनचे आयोजन केले होते. त्यात परीक्षेसंबंधी सर्व प्रक्रिया समजावून सांगण्यात आली.

तीन तासांची परीक्षा, सहा तास ताटकळत...

इतर कुठल्याही प्रवेश परीक्षा अथवा स्पर्धा परीक्षेपेक्षाही वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेसाठी (नीट) कडक नियम असतात. ७२० गुणांसाठी १८० प्रश्‍नांची ही ३ तासांची परीक्षा असते. प्रत्येक बरोबर उत्तराला ४ गुण, व चुकलेल्या उत्तरासाठी १ गुण अतिरिक्त कमी (निगेटिव्ह मार्किंग), अशी ही परीक्षा होते. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची भर उन्हात चांगलीच कसोटी लागते.

कारण, दरवर्षी मे महिन्यातच ही परीक्षा होते. परीक्षेचा कालावधी २ ते ५ असा होता. मात्र, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर अकरापासूनच येण्याच्या सूचना होत्या. काही विद्यार्थी ११, काही साडेअकरा, अशा टप्प्यात विद्यार्थ्यांना मध्ये सोडले जात होते. त्यामुळे अकरापासून सायंकाळी साडेपाचपर्यंत असे जवळपास सहा- सात तास विद्यार्थी व त्यांचे पालकही ताटकळले.

बाहेरगावाहून आलेल्यांचे हाल

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सकाळी अकरालाच केंद्रावर हजेरी लावाचयी होती. त्यामुळे बाहेरगावी केंद्र असलेले किंवा अन्य गावांहून जळगावात केंद्र असलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे प्रचंड हाल झालेत. कारण, अकरापूर्वीच त्यांना त्यांच्या गावाहून केंद्राच्या ठिकाणी हजर व्हावे लागले. शिवाय, सायंकाळी साडेपाच- सहापर्यंत थांबावे लागले. अनेक विद्यार्थ्यांसाठी चाळीसगाव, पारोळा, अशी दूरची केंद्रही होती. त्यांचीही चांगलीच दमछाक झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : कॉंग्रेसच्या समर्थनार्थ मतदारांची नावे वगळली- राहुल गांधीचा गंभीर आरोप

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

'दशवतार' सिनेमा ऑनलाइन लीक! अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली...'आपल्याच माणसांनी असं...'

सुरू होतोय Amazon Great Indian Festival 2025 Sale; स्मार्टफोन, लॅपटॉपसह 'या' २० वस्तूंवर ८०% पर्यंत डिस्काउंट

SCROLL FOR NEXT