Education department staff present while delivering books to schools. esakal
जळगाव

School First Day : भडगावात पहिल्याच दिवशी होणार स्वागत; 97 टक्के पुस्तके प्राप्त

School First Day : शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत.

सुधाकर पाटील

School First Day : तालुक्यात प्रत्येक शाळेवर विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी जंगी स्वागत होणार आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत भडगाव तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद, शासकीय अनुदानित व खासगी अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. २०२२-२३ च्या विद्यार्थी संख्येनुसार ६३ हजार ३०० पाठ्यपुस्तके मिळाली आहेत. (In Bhadgaon 97 percent books were received on first day )

शाळा उघडण्यापूर्वी शाळांना पुस्तके वाटप केली आहेत, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी गणेश पाटील यांनी दिली. गट साधन केंद्रातील कर्मचारी, समावेशित विशेष तज्ज्ञ निंबा परदेशी, सुभाष माळी, मनोहर माळी, किशोर पुजारी, मिलिंद सोनवणे, जितेंद्र माने, छाया देसले, किशोर पाटील, छाया ढोले व शिवाजी भोसले यांनी नियोजन केले आहे.

विद्यार्थ्यांचे होणार स्वागत

तालुक्यातील प्रत्येक शाळेत मिष्टान्न भोजन दिले जाईल. पुस्तके वाटप होतील. त्याअनुषंगाने सर्व मुख्याध्यापकांना शिक्षण विभागाने सूचना दिल्या आहेत. काही ठिकाणी पालक सभा होणार आहेत. (latest marathi news)

शाळांच्या दुरुस्त्यांचा विषय मार्गी

जिल्हा परिषद शाळांची लोकसभा निवडणुकीवेळी दुरुस्ती झाली होती. काही गावांमध्ये जिल्हा नियोजन मंडळातून, तर काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून निधी दिला होता. त्या माध्यमातून शाळा खोल्यांचे कामे झाली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात तालुक्यात शाळांना गळतीचा विषय नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. काही गावांत लोकसहभागातून शाळांचे रूपडे पालटले आहे. तालुक्यात वडगाव सतीचे येथे मराठी शाळेत व पिंपरखेड येथील उर्दू शाळेत प्रत्येकी एक शिक्षकांची आवश्यकता आहे. उर्वरित सर्व शाळांत पटसंख्येनुसार शिक्षक आहेत.

''शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना प्रवेशित वर्गाची पुस्तके मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगुणीक होतो. त्यासोबतच त्यांची उपस्थितीही टिकून राहते. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्याचबरोबर सर्व शाळा खोल्या सुस्थितीत आहेत.''-गणेश पाटील, गटशिक्षणाधिकारी, भडगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT