Ongoing use of solar energy for horticulture in Shiwar. esakal
जळगाव

Jalgaon News : सातपुड्यासह पायथ्यावर बागायतीत वाढ; कुपनलिकांसाठी सौरऊर्जेचा वापर

Jalgaon : गेल्या पाच ते सहा वर्षांत खानदेशातील उत्तर सीमेकडे असलेल्या आदिवासी पट्ट्यात व पायथ्यावर सौरउर्जेवर चालणाऱ्या विहिरी व कूपनलिकांचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : गेल्या पाच ते सहा वर्षांत खानदेशातील उत्तर सीमेकडे असलेल्या आदिवासी पट्ट्यात व पायथ्यावर सौरउर्जेवर चालणाऱ्या विहिरी व कूपनलिकांचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. काही भागात विविध योजनांद्वारे, तर काही ठिकाणी स्वतः खर्च करून शेतकऱ्यांनी सौरऊर्जेचा वापर सुरू केलेला आहे. खानदेशच्या उत्तर सीमेकडे असलेल्या मुक्ताईनगर, यावल, रावेर, चोपडा, शहादा, तळोदा, खापर, अक्कलकुवा, धडगाव आदी भागांत शेतीचे क्षेत्र कमी आहे. ( Increase in horticulture at foothills with Satpura)

मात्र, तरीदेखील पहाडी पट्ट्यामुळे विद्युत कनेक्शन घेणे व विजेचे खांब ट्यूबबेलपर्यंत आणणे कठीण जाते. त्यामुळे शेतजमीन बागायती होण्यापासून थांबली होती. मात्र, गेल्या पाच ते सहा वर्षांत या भागात विहिरी व कुपनलिकांचे प्रमाण वाढू लागलेले आहे. विशेष म्हणजे सौर उर्जेवर चालणारे पंपसेट या ठिकाणी बागायती होण्यास कारणीभूत ठरलेले दिसून येत आहेत. धुळे व नंदुरबार या दोन जिल्ह्यांत पहाडपट्टीत काही आदिवासी योजनांचा लाभ घेऊन असे पंप कार्यान्वित झालेले आहेत.

काही ठिकाणी कालव्यांवरही ते बसविण्यात आलेले आहेत. तर बऱ्याच भागात विद्युत कनेक्शन भेटत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकचा पैसा खर्च करून सौरप्लेट बसविल्या आहेत. त्याद्वारेच पाण्याचा उपसा करण्याचे प्रयोग सुरू झालेले आहेत. सौरउर्जेवर चालणाऱ्या पंपसेटमुळे भविष्यात भरावे लागणारे विद्युत बिलही त्यामुळे थांबणार आहे. त्यामुळे सुरुवातीलाच एकदा मोठा खर्च करण्यास काही शेतकरी आता पुढे येऊ लागलेले दिसत आहे. (latest marathi news)

त्यामुळे आदिवासी पट्ट्यातही बागायती क्षेत्रात वाढ होण्याचे प्रमाण दरवर्षीच वाढत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर पायथ्यावरही काही गावांमध्ये अशा प्रकारचे सौरपंप बसविण्यात आलेले आहेत. त्याद्वारे शेतजमिनी भिजविण्याचे काम सुरू झालेले आहे. एकंदरीतच गेल्या पाच-सात वर्षांचा आढावा घेतल्यास सातपुड्यामधील पहिली रांग व पायथ्यावरच्या गावांमध्ये सौरऊर्जेमुळे काही हजार एकर क्षेत्र भिजण्यास सौरऊर्जेच्या वापरामुळे शक्य झालेले आहे.

उत्पादनात वाढ झाल्याने बळ!

खानदेशच्या आदिवासी पट्ट्यात व पायथ्यावर सौरउर्जेवर चालणाऱ्या विहिरी व कूपनलिकांचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. या भागातील शेतकऱ्यांनीदेखील आता आधुनिकतेची कास धरल्याने त्या पद्धतीने शेती करण्यालाही प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळेच शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांने आर्थिक बळही मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : वक्फ कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 'या' तरतुदींना दिली स्थगिती, संपूर्ण कायदा रद्द करणार?

Mumbai Rain: मुंबईत विजांसह ढगांचा गडगडाट! पुढील ३ तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

Duleep Trophy Final : 4,4,W,4,W! CSK च्या गोलंदाजाचं मजेशीर षटक; पण, RCB च्या रजत पाटीदारच्या संघाला जेतेपद

Latest Marathi News Updates : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी, करमाळ्यातील कोर्टी गाव पाण्याखाली

Asia Cup 2025 Point Table : टीम इंडिया Super 4 मध्ये पोहोचली! पाकिस्तानला काय करावं लागेल?; ब गटात आघाडीसाठी मारामारी

SCROLL FOR NEXT