rice and pulses esakal
जळगाव

Jalgaon Inflation News: कालीमूछ तांदूळ हजार, चिनोरचे दर बाराशे ते पंधराशे! बासमती 1 ते 3 हजारांनी महाग; डाळींचे दर गगनाला भिडले

Jalgaon News : अनपॉलिश्ड इंद्रायणी ६५०० रुपये, तर आंबेमोहर ७८०० रुपये क्विंटल आहे. गेल्या आठवडाभरात वाढलेल्या दरांमुळे घराचे आर्थिक बजेट बिघडले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Inflation News : मागील वर्षी झालेल्या कमी पावसामुळे यंदा तांदळाच्या उत्पादनात घट झाली. परिणामी, आता पावसाळ्याच्या तोंडावर दरवाढ झाली आहे. गेल्या वर्षी साधा कालीमूछ तांदूळ साडेचार हजार रुपये क्विंटल होता. तो यंदा साडेपाच हजार रुपयांवर पोचला आहे.

चिनोरचे दर ६ हजार रुपयांवरून ७२०० ते ७५०० रुपयांवर पोहोचले आहेत. सोबतच इतर सर्व तांदळांची दरवाढ झाली आहे. बाजारात सध्या अनपॉलिश्ड इंद्रायणी, आंबेमोहोर या तांदळांना अधिक मागणी आहे. (Jalgaon inflation rates hike marathi news)

अनपॉलिश्ड इंद्रायणी ६५०० रुपये, तर आंबेमोहर ७८०० रुपये क्विंटल आहे. गेल्या आठवडाभरात वाढलेल्या दरांमुळे घराचे आर्थिक बजेट बिघडले आहे. गेल्या १५ दिवसांत डाळींचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. गेल्या पंधरवड्यात १४० ते १४२ रुपये किलो दराने विक्री होणारी तूरडाळ आता १८० रुपये किलोपर्यंत पोहोचली. हरभराडाळीचे दर ७० ते ७२ रुपये किलोवरून ९० ते ९२ रुपये किलोवर गेले आहेत.

डाळींचे दर गगनाला भिडले

उडीदडाळ ११२ रुपये किलो होती. सध्या या डाळीचे दर १३० ते १३२ रुपये किलो आहेत. डाळीचे दर महागल्याने आता सर्वसामान्य गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. (latest marathi news)

मागणीमुळे दरवाढ

गेल्या काही वर्षांत तांदळाच्या विविध प्रकारांना मागणी वाढली आहे. बिर्याणी, पुलाव, जिरा राईस आदींसाठी बासमतीचे विविध प्रकार ग्राहकांकडून खरेदी केले जातात. मागणी वाढली असली, तरी उत्पादनात मात्र घट झाल्याने त्याचे परिणाम दरवाढीत झाले. ग्राहकांकडून होणाऱ्या वार्षिक खरेदीवर परिणाम झाला आहे. तांदूळ आपल्या जेवणातील अविभाज्य घटक बनला आहे. बिर्याणीपासून खिर, इडली, डोसा अनेक चविष्ट पदार्थ यापासून तयार होतात. त्यामुळे तांदळाला मागणी आहे.

"मागील वर्षीच्या तुलनेत यंदा २० ते २२ टक्के दरवाढ आहे. गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने उत्पादनात घट झाली. एप्रिल महिन्यात काढणी होणाऱ्या तांदळाचे उत्पादनही घटले. यामुळे तांदळाची दरवाढ झाली आहे." - प्रशांत समदाणी, व्यापारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT