Preparations underway for the Yatra Festival of Malhari Martand Khandoba. esakal
जळगाव

Khandoba Yatrotsav : फैजपूर येथे रविवारपासून खंडोबाचा यात्रोत्सव

Khandoba Yatrotsav : मल्हारी मार्तंड खंडोबाच्या यात्रोत्सवाला रविवारपासून (ता. २४) सुरवात होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Khandoba Yatrotsav : येथील मल्हारी मार्तंड खंडोबाच्या यात्रोत्सवाला रविवारपासून (ता. २४) सुरवात होणार आहे. यासाठी मंदिर परिसरात विविध प्रकारचे पाळणे, मौत का कुआ, खाद्य पदार्थ, लहान मुलांची खेळणी विक्रीची दुकाने देवस्थान परिसरात दाखल होत आहेत. यात्रोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. परंपरागत आणि खानदेशातील प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फैजपूर येथे खंडोबाची यात्रा भरते. (Jalgaon Khandoba Yatra festival from Sunday in Faizpur)

यात्रेनिमित्त खानदेशातील भाविक दर्शनासाठी फैजपुरात हजेरी लावतात. यात्रोत्सवानिमित्त महाराष्ट्र व विविध राज्यातील व्यावसायिक आपल्या दुकानांसह गेल्या दोन, तीन दिवसांपासून खंडोबा देवस्थान परिसरात दाखल होत आहेत व जागा सांभाळून दुकाने थाटण्यासाठी तयारीला लागले आहेत.

यंदा देखील मोठ्या आकाराचे पाळणे, मौत का कुआ, विविध प्रकारचे पाळणे व दुकाने जागोजागी लावण्यासाठी व्यावसायिकांची लगबग सुरू झाली आहे. (latest marathi news)

दरम्यान, महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या व परंपरागत पद्धतीने भरणाऱ्या फैजपूर येथील मल्हारी मार्तंड खंडोबा देवस्थानच्या यात्रोत्सवाला सालाबाद प्रमाणे येत्या २४ मार्च फाल्गुन शुद्ध पौणिमेपासून प्रारंभ होणार असून, यानिमित्त देवस्थान व्यवसथापनकडून खंडोबा मंदिराची रंगरंगोटी, साफसफाई व दर्शनासाठी येणाऱ्या भावीनकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू केले आहे.

या ठिकाणी दरवर्षी भरणाऱ्या यात्रोत्सवाचे वेध लागले असून, यात्रोत्सवनिमित्त देवस्थान परिसरात दुकाने थाटण्याची व व्यावसायिक दाखल होण्याची लगबग सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT