Ladki Bahin Yojana esakal
जळगाव

Ladki Bahin Yojana: दाखला काढण्यासाठी लाडक्या बहिणीसह जावई सासुरवाडीत! पाहुणचारात गुंतले नातेवाईक; शासकीय लाभासाठी धावपळ सुरू

Jalgaon News : शासनाने लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. त्या योजनेचे अर्ज भरण्यासाठी व त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रे व दाखल्यांसाठी बहिणी आपल्या पतीसह माहेरात आल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

गणपूर (ता. चोपडा) : शाळेचा दाखला काढण्यासाठी शाळांमध्ये लाडक्या बहिणींसह पतीराजांचीही गर्दी वाढली आहे. त्यांनाही सासुरवाडीत यानिमित्ताने आयत्या पाहुणचारावर ताव मारण्याची संधी मिळाली आहे. (jalgaon Ladki Bahin Yojana Son in law with wife at in laws to get certificates)

शासनाने लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. त्या योजनेचे अर्ज भरण्यासाठी व त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रे व दाखल्यांसाठी बहिणी आपल्या पतीसह माहेरात आल्या आहेत. शासनाची लाडकी बहीण योजना सध्या खूप चर्चेत आहे. अर्ज'भरण्यासाठी सेतू सुविदा केंद्र, तलाठी कार्यालय यांसह सर्वच ठिकाणी गर्दी उसळली आहे.

झेरॉक्स सेंटर, अर्ज भरून देणारे सेंटरवरदेखील नंबर लावण्याची वेळ गर्दीमुळे आलेली आहे. ग्रामीण महिलांच्या बाबतीत शालेय शिक्षण व दाखल्यांबाबत पाहिजे तेवढी जागरूकता नाही. मात्र, वयाचे बंधन असल्याने व दाखल्याची गरज भासल्याने आता त्यांनी माहेर गाठले आहे. (latest marathi news)

दाखला आणण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक शाळांसह महाविद्यालयांत भगिनी पोहोचल्या आहेत. पतिराजांनी त्यांना सहकार्यासाठी सासुरवाडीत तळ ठोकला आहे. दरम्यान. जावईबापू आल्याने पाहूणचार वाढला आहे. लाडकी बहीण सध्या सर्वच शेतीची व दररोजची कामे सोडून अर्ज'भरण्याच्या तयारीला लागली आहे.

शालेय कामकाजातही दाखला घेणाऱ्यांची गर्दी वाढल्याने या कामाचा भार वाढला आहे. शाळा कामकाजात शिपाई, कारकून, मुख्याध्यापक व शाळेतील एक दोन शिक्षक त्या काळातील दाखले व नोंद शोधण्याच्या कामात मदतीसाठी गुंतल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT