Leopard (file photo) esakal
जळगाव

Jalgaon News : पाण्याच्या शोधात बिबट्याचा छावा विहिरीत; वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न

Jalgaon News : तालुक्यातील भोटा (ता.मुक्ताईनगर) शेती शिवारात पस्तीस ते चाळीस फुट खोल पाण्याच्या विहिरीत अन्न व पाण्याच्या शोधात बिबट्याचा छावा ( बिबट्याचे पिल्लू) पडले.

सकाळ वृत्तसेवा

कुऱ्हा काकोडा : तालुक्यातील भोटा (ता.मुक्ताईनगर) शेती शिवारात पस्तीस ते चाळीस फुट खोल पाण्याच्या विहिरीत अन्न व पाण्याच्या शोधात बिबट्याचा छावा ( बिबट्याचे पिल्लू) पडले. शेतकऱ्यांनी माहिती दिल्यानंतर वन विभागाच्या पथकाने त्याला सुखरूप बाहेर काढले. उन्हाचा कडाका इतका वाढला आहे की, जणू चैत्रातच वैशाख वणवा पेटला आहे. (Jalgaon Leopard fell in well in search of water)

भोटा शेती शिवारातील भोटा ते कोऱ्हाळा रस्त्यावरील गट नंबर १६८/२/२ मधील सचिन शर्मा यांच्या शेतातील पस्तीस ते चाळीस फुट खोल विहिरीत बिबट्याचा छावा पडला. आज गुरुवारी (ता.१८) सकाळी दहाला शेतात खत फेकण्याचे काम शेतमजूर करीत होते त्यावेळी विहिरीजवळ पाणी पिण्यासाठी गेलेला कुणाल वसंता महाले याला विहिरीत डरकाळ्याचे आवाज आले.

त्याने विहिरीत डोकावून पाहिले असता त्याला बिबट्याचे बछडे दिसले. त्याची चांगलीच भंबेरी उडाली त्याने शेत मजुर महिलांना सांगितले त्यांनंतर वनविभागाला याची माहिती देण्यात आली. वनाधिकारी परिमल साळुंके, वनपाल डी. जी. पाचपांडे.

वनरक्षक सुधाकर कोळी, वनरक्षक स्वप्नील गोसावी, वनरक्षक अक्षय मोरे व वनमजूर यांनी घटनास्थळी गर्दीला बाजूला करुन लोखंडी पिंजरा विहिरीत आत सोडला आणि दोराच्या साहाय्याने बांधलेले पिंजऱ्याचे लोखंडी गेट वर उचलताच बिबट्याच्या पिल्लाने पिंजऱ्यात आत प्रवेश केला आणि गेट बंद झाले पिंजरा विहिरीच्या वरती घेण्यात आला. अवघ्या काही मिनिटांतच हे ऑपरेशन फत्ते झाले. (latest marathi news)

पशुवैद्यकीय टिम कडून तपासणी

मुक्ताईनगर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.शांताराम जाधव व त्यांचे सहकारी डॉ.अश्विनी दाभाडे, डॉ.प्रशांत लोंढे, डॉ.स्वागती कारमुंगे , डॉ.नामदेव जवरे या पशुवैद्यकीय पथकाने बिबट्याच्या छाव्याची तपासणी केली. त्याला कुठलीही इजा नाही असे सांगितले जवळपास साडे पाच ते सहा महिन्यांचे हे बछडे असल्याचे सांगण्यात आले.

"भोटा, रिगांव, पिंप्राळा शेती शिवारात वन्यप्राण्यांचा संचार आहे तसेच पिकांचे नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असते या शिवारात बिबट्या‌ ( मादी) दोन पिल्लांसह संचार करीत असल्याचे शेतकरी व शेतमजुरांकडून सांगण्यात आले. त्यामुळे रात्री बेरात्री शेतात जाताना भीती वाटते." - स्थानिक शेतकरी

"शेतकऱ्यांनी रात्री अपरात्री शेतात जाताना एकटे जाऊ नये समूहाने जावे. शेती शिवारातील विहिरींचे कठडे उंच बांधावे. वन्यप्राण्यांच्या बाबतीत कुठे काही आढळल्यास वनविभागाला सांगावे व सहकार्य करावे." - परिमल साळुंके (वढोदा वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT