Leopard spotted by forest department staff. esakal
जळगाव

Jalgaon Leopard News : पालच्या जंगलात बिबट्याचे दर्शन; आज लख्ख चांदण्या रात्री वन्यप्रेमीना जंगली प्राण्याचा सहवास

Jalgaon : पाल (ता.रावेर) येथील वनक्षेत्रात काल रात्री साडे अकराच्या सुमारास यावल वनविभागाच्या कर्मचारी गस्त घालत असताना बिबट्याचे दर्शन घडले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Leopard News : पाल (ता.रावेर) येथील वनक्षेत्रात काल रात्री साडे अकराच्या सुमारास यावल वनविभागाच्या कर्मचारी गस्त घालत असताना बिबट्याचे दर्शन घडले. तर आठ दहा दिवसांपूर्वी याच परिसरात पट्टेदार वाघाचेही दर्शन घडल्याचे सांगण्यात आले. यावरून चोपडा ते पाल दरम्यान असलेल्या जंगलात अनेक बिबटे, अस्वल आदी प्राणी असल्याचे सिद्ध होते. अशी माहिती यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक जमीर एम. शेख यांनी दिली. (Jalgaon Leopard sighting in Pal forest )

जंगलात वनविभागातर्फे दररोज पेट्रोलिंग होते. त्याचदरम्यान बिबट्या दबा धरून बसलेला होता. त्याचा फोटो मोठ्या शिताफीने अंधारात काढण्यात आला. नंतर बिबट्या निघून गेल्यानंतर पुन्हा पेट्रोलिंग सुरू करण्यात आली.

आज प्राणी निरीक्षण

यावल वन विभागातील चोपडा वनक्षेत्रापासून ते रावेर वनक्षेत्रामधील ठिकठिकाणी जंगल भागात प्राणी गणनेसाठी उद्या (ता.२३)बुद्धपौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लख्ख प्रकाशात संपूर्ण रात्र जंगलातील थरार अनुभवण्याची संधी वन्यजीव प्रेमींना मिळणार आहे.

यासाठी विविध ४३ ठिकाणी मचाण तयार केले आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी, रेल्वेचे डीआरएम इति पांडे या मोहिमेत सहभागी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Samman Nidhi : प्रतिक्षा संपली ! देशातील १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी जमा होणार २००० रुपये

Palghar : भाजपने पालघर साधू हत्याकांडाचे आरोप ज्यांच्यावर केले त्याच नेत्याला घेतलं पक्षात, प्रवेशाचा मोठा कार्यक्रम

Amravati:'पोटातल्या बाळासह गर्भवतीचा आणि इतर २ बालकांचा मृत्यू'; उपजिल्हा रुग्णालयातली धक्कादायक घटना..

Latest Marathi Breaking News : परंडा नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचा अर्ज दाखल; तानाजी सावंत उपस्थित

Kolhapur Weather: कोल्हापुरात मध्यरात्री तापमान १४ अंश सेल्सिअसवर! दाट धुक्यात हरवले शहर, नागरिकांनी पेटवल्या शेकोट्या

SCROLL FOR NEXT