Unmesh Patil, Karan Pawar  esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Constituency : उन्मेश पाटील, करण पवारांच्या पक्षांतराबद्दल नेते अनभिज्ञ

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेश पाटील व पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार पक्ष सोडून ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेश पाटील व पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार पक्ष सोडून ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत. मात्र याबाबत जिल्ह्याचे नेते व राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, याबाबत आपल्याला केवळ सोशल मिडीयावर व माध्यमाकडून माहिती मिळाली आहे, प्रत्यक्षात दोघांशी आपला संपर्क झालेला नाही. (Jalgaon Lok Sabha Constituency)

भारतीय जनता पक्षाची जळगाव लोकसभेची उमेदवारी नाकारलेले खासदार उन्मेश पाटील व पारोळ्याचे भाजपचे माजी नगराध्यक्ष करन पवार हे उद्या (ता.३) मुंबईत दुपारी बारा वाजता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करीत आहेत. उन्मेश पाटील यांना उमेदवारी नाकारल्याने जळगाव लोकसभेत काही अंशी खदखद निर्माण झाली, त्यानंतर दोघांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

मुंबई येथे दोघांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांची चर्चा सुरू आहे. त्यांच्या समवेत जळगाव येथील शिवसेनेचे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे काही पदाधिकारी आहेत. सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे.

मुंबईत सुरू असलेल्या या घडामोडीमुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातही जोरदार खळबळ उडाली असून भारतीय जनता पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. जळगाव व रावेर लोकसभेत भाजप उमेदवारांवर त्यांचा परिणाम होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. (latest marathi news)

याबाबात भारतीय जनता पक्षाचे नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यांशी संपर्क साधला असता गिरीश महाजन म्हणाले, की जिल्ह्यातील मुंबईत सुरू असलेल्या घडामोडीची माहिती आपल्या प्रसिध्दी माध्यम व सोशल मिडियावरून मिळाली आहे. परंतु खासदार उन्मेश पाटील व करण पवार यांनी आपल्याशी कोणताही प्रत्यक्ष संपर्क साधलेला नाही.

गेल्या चार पाच दिवसापासून आपण मुंबईतच आहोत परंतु त्यांनी आपल्याशी संपर्क केलेला नाही. त्यामुळे ते भाजप सोडणार असल्याबाबत कोणतीही चर्चा नाही व याची माहितीही नाही. त्यांनी संपर्क केल्यास आपण त्यांच्याशी निश्‍चित चर्चा करणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pratap Sarnaik: विरार दुर्घटनेतील रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात मिळणार म्हाडाची घरे, परिवहन मंत्र्यांचा निर्णय

Headmaster Post : पुणे जिल्ह्यातील १६८ शिक्षकांची मुख्याध्यापक पदी वर्णी

गुंड्याभाऊ हरपले ! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचे निधन; मराठी सिनेविश्वावर शोककळा

Fadnavis Reaction on Jarange Hunger Strike: मनोज जरांगेंच्या उपोषणावर मुख्यमंत्री फडणवीसांनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले..

Latest Maharashtra News Updates live: नागपुरात ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण

SCROLL FOR NEXT