raksha khadse and shriram patil esakal
जळगाव

Bhusawal Vidhan Sabha Constituency : भुसावळमधून रक्षा खडसेंना मताधिक्य ‘फिक्स’... पण किती? परंपरागत भाजपच्या पाठीशी

Vidhan Sabha Constituency : सामाजिकदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या भुसावळ शहरासह ग्रामीण भागाचे एकत्रित विधानसभा क्षेत्र नेहमीच भाजपचे मतदार राहिले आहे.

श्रीकांत जोशी

Bhusawal Vidhan Sabha Constituency : सामाजिकदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या भुसावळ शहरासह ग्रामीण भागाचे एकत्रित विधानसभा क्षेत्र नेहमीच भाजपचे मतदार राहिले आहे. गेल्या २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाने भाजप उमेदवार रक्षा खडसेंना ५० हजारांहून अधिक मताधिक्य दिले आहे. यंदा ते खडसेंचे मताधिक्य ‘फिक्स’ मानले तरी ते किती मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (Raksha Khadse majority from Bhusawal is fixed )

महायुतीच्या उमेदवार भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर सुमारे महिनाभरापासूनच भुसावळ तालुक्यात प्रचारास सुरवात झाली. ‌प्रचाराचे नेतृत्व अर्थात भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्याकडे होते. स्वच्छ प्रतिमा व संघटनकौशल्य या जोरावर त्यांनी प्रचाराचे नियोजन केले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील यांची उशिरा उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे किमान भुसावळ तालुक्यात ही निवडणूक एकतर्फी होईल, असे वाटू लागले होते.

चौधरींचे नाराजी नाट्य

त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी यांचे नाराजी नाट्य घडले. त्यामुळे भाजप समर्थक रक्षा खडसे भुसावळ तालुक्यातून एक लाखाचे मताधिक्य घेतील, असा दावा करू लागले. मात्र मतदानाच्या शेवटच्या चार दिवसांत परिस्थिती पार बदलली. माजी आमदार संतोष चौधरी सक्रिय झाले. त्यांच्या सभा गाजू लागल्या. ग्रामीण भागात विशेषतः साकेगाव, कुऱ्हे (पानाचे), मोंढाळा आदी ठिकाणी श्रीराम पाटील यांच्या प्रचाराने जोर पकडला.‌

स्थानिक मुद्द्यांसह जातीचे राजकारण

राज्य सरकारविषयी शेतकऱ्यांची नाराजी, भुसावळ शहराचा बिकट पाणीप्रश्न, काही भागांतील रस्त्यांची दुरवस्था आदी स्थानिक मुद्दे प्रचारात आले.‌ मुस्लिम, मराठा अशी मते पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. तर ओबीसी, मध्यमवर्गीय, व्यापारी, व्यावसायिक यांची मते खडसे यांच्या पाठीशी होती. (latest political news)

मतदानाच्या दिवशी काही भागात सकाळी मतदारांनी स्वयंस्फूर्तीने रांगा लावल्या होत्या. हे दृश्य पहिल्यांदाच दिसत होते.‌ नंतर मतदानाची गती कमी झाली.‌ असे असले तरी २०१९ च्या तुलनेत यंदा दोन टक्के मतदान जास्त झाले.‌ मागील वेळेस भुसावळ विधानसभा क्षेत्रात लोकसभेसाठी ५५.४३ टक्के मतदान झाले, तर यंदा ५७.३३ टक्के मतदान झाले.‌

दोन टक्के वाढलेले मतदान कोणाला लाभदायक ठरेल? याची चर्चा रंगत असतानाच एक गोष्ट निश्चित आहे, ती म्हणजे खडसे यांचे मताधिक्य गेल्या वेळेपेक्षा कमी होईल. मागील निवडणुकीत ५० हजार ८८८ इतके मताधिक्य रक्षा खडसे यांना डॉ. उल्हास पाटील यांच्यापेक्षा मिळाले होते. यंदा हे मताधिक्य ३०-४० हजारांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

यात श्रीराम पाटील यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात घेतलेली आघाडी, खडसेविरोधी मतांचे झालेले एकत्रीकरण, शेवटी भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवून ठेवण्यात नेतृत्वाला आलेले अपयश आदी कारणे आहेत.‌ वंचितचे संजय ब्राह्मणे किती मते घेतात, यावरही मताधिक्य अवलंबून आहे. मागील निवडणुकीत वंचितांच्या उमेदवाराला १५ हजार सहाशे ३९ मते मिळाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT